शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामचे दोन वर्षांपासून तीन कोटी रुपये शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:59 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एककडे दोन वर्षांपासून तब्बल चार कोटी रूपये पडून होते. चालू वर्षात रस्ते दुरुस्तीवर त्यापैकी एक कोटीचा खर्च झाल्याने अद्याप तीन कोटी रूपये शिल्लक आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ग्रामीण रस्त्यांनी चालणे झाले अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एककडे दोन वर्षांपासून तब्बल चार कोटी रूपये पडून होते. चालू वर्षात रस्ते दुरुस्तीवर त्यापैकी एक कोटीचा खर्च झाल्याने अद्याप तीन कोटी रूपये शिल्लक आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. बांधकाम क्रमांक एक आणि दोनला कामे करण्यासाठी १६ तालुके वाटून देण्यात आले. ग्रामीण जनता रस्ते नसल्याची ओरड करीत असताना बांधकाम विभाग निधी असून रस्ते दुरुस्तीसाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. बांधकाम विभाग क्रमांक एकला २०१६-१७ मध्ये शासकीय योजनेतून तब्बल चार कोटी १० लाख रूपयांची तरतूद करून देण्यात आली. मात्र प्रचंड उदासिनतेमुळे मार्च १७ अखेरपर्यंत हा विभाग छदामही खर्च करू शकला नाही.या विभागाकडे चार कोटी रूपये अखर्चित राहिले. विशेष म्हणजे वर्षभरापासून पडून असलेला हा निधी अद्याप पूर्णपणे खर्च झाला नाही. आता उर्वरित केवळ तीन महिन्यात तो खर्ची घालण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले. या विभागाला गट अ, गट ब, गट क, गट ड आणि ई अंतर्गत रस्ते दुरुस्ती व परीरक्षणासाठी ३०५४-२४१९ शीर्षाखाली तब्बल चार कोटी १० लाखांचा निधी मिळाला. हा निधी मार्च १७ पर्यंत खर्ची घालायचा होता. मात्र वर्षभर तो तसाच पडून राहिला. चालू आर्थिक वर्षांतही हा निधी खर्च करून रस्ते दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने सतत चालढकल केली.या विभागाने डिसेंबर अखेरपर्यंत चार कोटी १० लाखांपैकी केवळ एक कोटी १० लाखांचा निधी खर्च केला. अद्याप या विभागाकडे तब्बल दोन कोटी ९९ लाख ६३ हजारांचा निधी शिल्लक आहे. हा सर्व निधी ३१ मार्च १७ पर्यंत खर्च न झाल्यास रस्त्यांची दुर्दशा होणार आहे. निधी असूनही अधिकारी तो खर्ची घालण्यास चालढकल करीत असल्याने ग्रामीण रस्त्यांची पुरती वाट लागत आहे.इमारत दुरूस्ती, देखभालीकडे दुर्लक्षबांधकाम एकला नागरी इमारत दुरुस्ती आणि यंत्र व साधन सामुग्रीसाठी २०१६-१७ मध्येच १५ लाख ४० हजार रूपये मिळाले. या निधीपैकी पाच लाख ६४ हजार रुपये शिल्लक आहे. निधी नसल्याची ओरड करणाºया या विभागाकडे निधी पडून असूनही कामे का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या दोन्ही बांधकाम विभाग प्रभारावर असल्याने सर्वत्र आॅलवेल आहे.