शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांनो, सत्तेची किल्ली ताब्यात घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:35 IST

आरोपी मनोहर कुलकर्णीने हिंदूंचे दोन प्रकार स्पष्ट केले. मनूला मानणारे आणि ज्ञानेश्वर-तुकारामाला मानणारे. त्याच्याप्रमाणेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मनूलाच मानतात. म्हणूनच सापाचे निमित्त करून त्यांनी विठ्ठलदर्शन टाळले. हे मनुवादी सरकार उलथविण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे वंचित बहुजन आघाडीच, असे सांगत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजनांना सत्तेची किल्ली ताब्यात घेण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीची यवतमाळात संवाद यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरोपी मनोहर कुलकर्णीने हिंदूंचे दोन प्रकार स्पष्ट केले. मनूला मानणारे आणि ज्ञानेश्वर-तुकारामाला मानणारे. त्याच्याप्रमाणेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मनूलाच मानतात. म्हणूनच सापाचे निमित्त करून त्यांनी विठ्ठलदर्शन टाळले. हे मनुवादी सरकार उलथविण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे वंचित बहुजन आघाडीच, असे सांगत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजनांना सत्तेची किल्ली ताब्यात घेण्याचे आवाहन केले.वंचित बहुजन आघाडीची ‘संवाद यात्रा’ शनिवारी यवतमाळात पोहोचली. त्यावेळी येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. मात्र मागील सरकारने ते केले नाही. सध्याच्या सरकारचीही ती इच्छा नाही. कारण त्यांना ओबीसींचे भले करायचेच नाही. आरएसएस आणि काँग्रेसने कधीही वंचित समाजाला उमेदवारी दिली नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे येत्या निवडणुकीत किमान ५० जागांवर लहान ओबीसींमधील (अतिपिछडा ओबीसी) न्हावी, शिंपी, सोनार अशांना उमेदवारी दिली जाईल. सध्या राजकारणात जातींच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हा चक्रव्यूह भेदण्यासाठी वंचित बहुजनांच्या आघाडीचे अस्त्र तयार झाले आहे.प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार असल्याने आपण राजकीयदृष्ट्या समान आहोत. मात्र लोकशाहीचे सामाजीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या जातीचा उमेदवार पाहून मत देऊ नका. तर वंचितांसाठी काम करणारा उमेदवार निवडा, असे आवाहन करताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. आपल्या पत्नीशी त्यांनी जसा व्यवहार केला, तसाच व्यवहार ते आता जनतेशी करीत आहे. म्हणूनच अमेरिकेत एखादा उमेदवार आपल्या कुटुंबात कसा वागतो, ते पाहूनच मतदान केले जाते. भारतात मात्र जातीचा विचार करून उमेदवार निवडला जातो आणि तो सत्तेत बसल्यावर आपण पश्चात्ताप करतो. त्यामुळे येत्या लोकसभा, विधानसभेत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना टाळून वंचित बहुजन आघाडीलाच मत द्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोरे (गोबरे) होते. माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजयराव मोरे, युसूफ पुंजवानी, गुणवंत देवपारे, डॉ. दिलीप घावडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, कैलास पवार, लटारी मडावी, भास्कर पंडागळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. मेळाव्याला सर्व तालुक्यातून नागरिकांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर