सत्यपाल महाराज : संताजी महाराज पुण्यतिथी महोत्सवयवतमाळ : जगदगुरू तुकाराम महाराजांची गाथा संत संताजी महाराजांमुळेच सुरक्षित राहिली. संताजींचा सामाजिक समरसतेचा संदेश सर्वत्र पोहोचविणे काळाची गरज आहे. बहुजन समाजाने व्यसन आणि अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे. या समाजाने शिक्षणाकडे वळावे, सामाजिक जीवन जगताना १०० दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा आणि राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावा, असे प्रतिपादन सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले.श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित श्री संताजी पुण्यतिथी उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या महोत्सवात समाजात शिक्षण प्रचार व सेवा करणाऱ्या मंडळांद्वारे वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून संताजी पुण्यतिथी महोत्सव घेण्यात येत आहे. दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.महोत्सवासाठी दहा हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. महिलांसाठी रांगोळी, डिश डेकोरेशन, संगीत खुर्ची, निंबू चमचा, धावण्याची स्पर्धा व संगीत रजनी आदी स्पर्धा होत आहे. नारायणराव माकडे विद्यालय आणि रामभाऊजी ढोले कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, शारीरिक शिक्षण दिन शिवाय विविध कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवासाठी श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उत्तम गुल्हाने, उपाध्यक्ष गोपाळ पाटील, सचिव सुरेश अजमिरे, सहसचिव देवीदास देऊळकर, डॉ. संजय अंबाडेकर, राजेश चिंचोरे, महेश ढोले, रत्नाकर पजगाडे, एस.टी. गुल्हाने, नामदेवराव जयसिंगपुरे, चंद्रशेखर मोहरकर, बाळासाहेब शिंदे, राजेश गुल्हाने, रावसाहेब काळे, बाबा देवतळे, डॉ. दीपक शिरभाते, प्रमोद गुल्हाने, जगदीश श्रीराव, अमोल काटेखाये, श्रीराम गुल्हाने, बाळासाहेब गिरूळकर, रमेश अगरवाल, संतोष डोमाळे, मामा मरगडे, किशोर थोटे, किशोर पाटील, आर.आर. शिरभाते, रमेश शिरे, किशोर सुखसोहळे, वैभव बुटले, महिला मंडळाच्या अध्यक्ष संजीवनी अंबाडेकर, उपाध्यक्ष अश्विनी पजगाडे, सचिव कल्पना डहाके, अंजली श्रीराव, कल्पना गुल्हाने, विद्या चिंचोरे, वंदना गिरोळकर, शिल्पा पाटील, सूमन साखरकर, शुभांगी अंबाडेकर आदी पुढाकार घेत आहे. (वार्ताहर)
बहुजन समाजाने शिक्षणाकडे वळावे
By admin | Updated: December 20, 2014 22:47 IST