शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २० हजार प्राध्यापकांचा अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 07:00 IST

Reservation, Education sector, Yawatmal News महाराष्ट्रात १९९० पासून सहायक प्राध्यापक भरतीसाठी विषयनिहाय आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र काही संघटनांकडून केंद्रीय विद्यापीठांच्या धर्तीवर संवर्गनिहाय २०० पॉईंट रोस्टर लागू करण्याचा आग्रह धरला जात आहे.

ठळक मुद्देविशेष भरतीची मागणीसंवर्गनिहाय रोस्टरला मागासवर्गीयांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात अनेक वर्षांपासून प्राध्यापक पदभरती रखडल्याने अनुदानित विविध वरिष्ठ महाविद्यालयात २० हजार सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. आता उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी ४० टक्के पदभरतीची घोषणा केलेली असताना २०० पॉईंट रोस्टर लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. असे झाल्यास आधीच संधी न मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवारांना पुन्हा भरतीपासून लांब जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.महाराष्ट्रात १९९० पासून सहायक प्राध्यापक भरतीसाठी विषयनिहाय आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र काही संघटनांकडून केंद्रीय विद्यापीठांच्या धर्तीवर संवर्गनिहाय २०० पॉईंट रोस्टर लागू करण्याचा आग्रह धरला जात आहे. केंद्र सरकारने ९ जुलै २०१९ रोजी हा कायदा केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांसाठी केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यापीठात व शिक्षण संस्थांत संवर्गनिहाय रोस्टर लागू करण्याची मागणी चुकीची असल्याचे मत फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर उईके यांनी व्यक्त केले. आता सध्या अस्तित्वात असलेल्या १०० बिंदूनामावलीनुसारच विषयनिहाय प्रध्यापक पदभरतीत ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटीची पदे भरण्याचा क्रमांक आलेला आहे. आता २०० पॉईंट रोस्टर लागू झाल्यास या मागासवर्गीय उमेदवारांवर पुन्हा एकदा अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी रोस्टर पद्धती लागू करू नये, अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने केली आहे.म्हणून शिल्लक राहिला अनुशेषगेल्या २५-३० वर्षात १०० बिंदूनामावलीनुसार पदभरती केली जात आहे. एखाद्या विषयाची चार पदे भरताना दोन पदे खुल्या वर्गासाठी राखीव तर इतर दोन पदे आळीपाळीने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विजाभज, विशेष मार्गास प्रवर्गाकरिता राखवी ठेवण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणी रोस्टर घोटाळ्याची प्रकरणेही पुढे आली. राखीव प्रवर्गातील जागांवर उमेदवार उपलब्ध नसल्याचे निमित्त सांगत राखीव जागा इतर प्रवर्गात परावर्तीत करून घेतल्याचा आरोप ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने केला आहे. त्यामुळे आता केवळ एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गाचाच अनुशेष भरणे शिल्लक आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र