शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

नेर येथील लाचखोर वनपालाला कारावास

By admin | Updated: December 23, 2016 02:19 IST

शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी

एक वर्ष : वृक्षतोड परवान्यासाठी लाच यवतमाळ : शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी नेर येथील वनपालाला जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. सुधीर लक्ष्मणराव इंगोले, नेर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे दिलीप धुमाजी जाधव, रा. मालखेड या शेतकऱ्याने शेत गट नं. ८० मधील सागवान झाडाची तोड करण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी त्याने शेतकऱ्याला एक हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत शेतकऱ्याने तक्रार नोंदविली. त्यावरून २४ मार्च २०११ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नेर येथील वन नाक्यावर वनपालाला लाच घेताना रंगेहात पकडले होते. या खटल्यात दिलीप जाधव, संजय गंधरवार, मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, एसीबीचे उपअधीक्षक ए.डी. जहरवाल यांची साक्ष ग्राह्य धरीत जिल्हा सत्र न्यायाधीश द्वितीय ए.एस. वाघमारे यांनी आरोपीला एक वर्ष कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात विजय तेलंग यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद केला. (कार्यालय प्रतिनिधी)