लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : लोकमत वृत्तपत्र समूहाकडून राबविण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ या सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील चिंतामणी विद्यालयात करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य नरेश गोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक रमेश खडतकर, प्रा.उमेश क्षीरसागर, रमेश घोडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रज्वल गजानन काळे, रोशनी महेंद्रचंद कोठारी, जान्हवी संजय बोभाटे, करण अनिल भोयर, गायत्री कैलास कोडापे, सुजल प्रवीण जयसिंगपूरे, दीक्षा कवाडे, मोहम्मद नदीम नूर मोहम्मद, आदर्श सुनील फाळे, निशांत संजय गजबे, आफताब हबीब शेख, हर्षवर्धन श्रीराम आयटे, सुमीत सुधाकर खैरकार, वृषभ जितेंद्रचंद कोठारी, तन्मय शशिकांत वाके, अलफीया नाज नूर महंमद, आर्यन प्रवीण लाखीयाँ, तश्मय गजानन राऊत, सिध्देश बसवेश्वर माहुलकर, अभिश्वेता विठ्ठल दाते, विशाखा गजानन वाईरकर, मयुरी विष्णू गंडे, रक्षा घनश्याम बरडे, दीपाली प्रभाकर कोटजावळे, प्रगती दादाराव राऊत आदी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन लोकमत तालुका प्रतिनिधी गजानन अक्कलवार यांनी केले. ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कमल भारती, शीला बोबडे, छाया गोंडे, मीनाक्षी ढोले, प्रदीप हांडे, प्रमोद उरकुंंदे, ऋषीकेश गोमाशे आदींनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना विद्यालयाचे प्राचार्य नरेश गोडे यांनी त्यांची आई छबुबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहावीमध्ये वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या पाच वर्षापर्यंत रोख बक्षीस देण्याची घोषणा केली. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
By admin | Updated: May 12, 2017 00:34 IST