लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : उत्सव काळात अप्रिय घटना घडून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्या आणि सण-उत्सव शांततेत साजरे करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले. येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते.आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमिवर येथील पोलीस ठाण्यातर्फे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार म्हणाले, सण-उत्सव साजरे करताना मिरवणुकीतील देखावे हे सामाजिक सलोखा निर्माण करणारे असावेत. आपल्या कार्यक्रमातून इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, आपल्या आनंदातून दुसऱ्याला दु:ख होऊ नये, एवढी काळजी घेत उत्सव शांततेत, दुर्घटना विरहित पार पाडावेत. उत्सवाच्या काळात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असतो. त्यामुळे आपल्या परिसरातील आपलाच माणूस आपल्याच उत्सवात आपल्या सुरक्षेसाठी झटतो आहे, याचे भान ठेवले पाहिजे. उत्सव शांततेत साजरे केल्यास पोलिस कर्मचाºयांनाही सवड मिळून उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येईल, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.गणेशोत्सवासंदर्भात काही अडचण आल्यास प्रत्यक्ष भेटा, या तालुक्यातील सर्व नागरिक नियम पाळणारे असून त्यांच्या मदतीनेच कुठल्याही प्रकारची अडचण या सण-उत्सवात येणार नाही, अशी ग्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी आपल्या भाषणातून दिली. उत्सवाच्या काळात शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष बबनराव इरवे, माजी नगराध्यक्ष अशोक चिरडे, प्रा.अजय दुबे, अशोक काटकर, वºहाडी कवी रशिद कुरेशी, रमेश सत्तूरवार, आरिफ काजी आदींनी विचार मांडले. गणेश मंडळाच्यावतीने गजेंद्र चव्हाण यांनी सूचना केल्या. संचालन देवराव राठोड, प्रास्ताविक ठाणेदार प्रदीप साळुंखे, तर आभार पीएसआय प्रताप बाजड यांनी मानले. बैठकीला तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, शांतता कमिटी सदस्य ,गणेश मंडळाचे पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.गणेशोत्सवात चोख पोलीस बंदोबस्तदारव्हा तालुक्यात १०३ गणेश मंडळे यावर्षी श्री गणेशाची स्थापना करणार आहे. यात शहरात ३३, तर ग्रामीण भागात ७० मंडळे श्रींच्या मूर्तीची स्थापना करणार आहे. या मंडळासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येईल. गणेशोत्सवाचे दहा दिवस व विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तसेच इतर तयारीबाबतची माहिती ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी दिली.
उत्सवकाळात अप्रिय घटना टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST
आपल्या कार्यक्रमातून इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, आपल्या आनंदातून दुसऱ्याला दु:ख होऊ नये, एवढी काळजी घेत उत्सव शांततेत, दुर्घटना विरहित पार पाडावेत. उत्सवाच्या काळात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असतो. त्यामुळे आपल्या परिसरातील आपलाच माणूस आपल्याच उत्सवात आपल्या सुरक्षेसाठी झटतो आहे, याचे भान ठेवले पाहिजे.
उत्सवकाळात अप्रिय घटना टाळा
ठळक मुद्देएम. राज कुमार : दारव्हा शहरात ३३ तर ग्रामीण भागात ७० गणेशमूर्तींची होणार स्थापना