शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:36 IST

आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देचिंता मिटली : वाघासह बछड्यांना इतरत्र हलविणार, वनविभागाचा ‘वॉच’

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे. पित्याच्या तालमीत या बछड्यांनी शिकारीचे प्रशिक्षण घेतले, असे वनविभागाचे अधिकारी सांगतात.१३ जणांच्या बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. ही वाघीण दोन बछड्यांसह राळेगाव तालुक्यातील बोराटीच्या जंगलात वास्तव्याला होती. यादरम्यान नर वाघदेखिल तिच्यासोबत होता. दोन वर्षांत १३ जणांवर हल्ले करून ठार मारणाºया अवनीची पंचक्रोशीत दहशत पसरली होती. यामुळे ट्रॅन्क्युलाईज करून तिला पकडा अथवा वेळप्रसंगी ठार मारा, असे आदेशच न्यायालयाने दिले होते. मात्र वन्यजीवप्रेमींचा याला विरोध होता. वनविभागाचे २०० च्यावर अधिकारी व कर्मचारी बोराटीच्या जंगलात रात्रंदिवस अवनीचा शोध घेत होते. अखेर २ नोव्हेंबरच्या रात्री अवनी वनविभागाच्या पथकाच्या टप्प्यात आली आणि शार्पशुटर शहाफत अली खान याचा मुलगा अजगर अली याने अवनीला गोळ्या घातल्या.या घटनेनंतर अवनीच्या बछड्यांचे काय, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींसह सर्वांनाच छळू लागला. वयाने लहान असल्याने हे बछडे शिकारही करू शकत नव्हते. त्यामुळे वनविभागाने या बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम हाती घेतली. दोघांनाही ट्रँन्क्युलाईज करून सुरक्षित पकडण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता दोन बछड्यांसह नर वाघालाही ट्रँन्क्युलाईज करून अन्य जंगलात सोडण्याचा प्लॅन वनविभागाने आखला आहे.त्यासाठी वनविभागाचे पथक बोराटीच्या जंगलात डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. ज्या परिसरात हे बछडे फिरत आहे, त्या परिसराला कंपाउंड करून बछडे व नर वाघाला पकडण्याचा प्रयत्न या पथकाकडून केला जात आहे. बछड्यांचे पगमार्क याच भागात आढळत असल्याने त्याचठिकाणी असल्याची खात्री वनविभागाला आहे.पितृत्वाच्या तालमीत शिकारीचे धडेअवनी वाघिण जीवंत असताना बछडे लहान असल्याने ती स्वत: शिकार करून आपल्या बछड्यांची भूक भागवित होती. आईच्या सावलीत वाढत असलेल्या बछड्यांना मात्र काही काळातच अनाथ व्हावे लागले. अवनीला ठार मारल्यानंतर नर वाघाने मात्र बछड्यांची साथ सोडली नाही. तो सावली बनून या बछड्यांच्या सोबत अजुनही भटकत आहे. भूकेने व्याकुळ होऊन बछड्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून वनविभागाने डुकरांचे छोटे पिल्लंदेखिल त्या भागात सोडले. बछडे मात्र पित्याच्या तालमीत शिकारीचे धडे गिरवत होते. शिकारीत पारंगत होऊन हे बछडे अलिकडे आता स्वत:च शिकार करीत असल्याची माहिती एका जाणकार वन्यजीवप्रेमीने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. असे असले तरी भविष्यात हे बछडे मोठे होऊन पुन्हा वाघ मानव संघर्ष पेटू नये, यासाठी बछडे व नर वाघाला ट्रँन्क्युलाईज करून पकडण्याच्या मोहिमेला वनविभागाने वेग दिला आहे.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणTigerवाघ