शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अवनी वाघिणीचा बछडा बेपत्ताच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

राळेगाव, केळापूर, घाटंजी तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये दहशत निर्माण केलेल्या अवनी या पट्टेदार वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास बोराटी जंगल परिसरात वन खात्याच्या असगरअली या शार्पशूटरने टिपले. दुसºया वाघिणीच्या मुत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली असता तिला नेम धरुन गोळी मारण्यात आली.

ठळक मुद्देअवनीला ठार मारुन वर्ष लोटले। ७० लाखांचा खर्च, एक बछडा पेंचमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार करणाऱ्या अवनी या पट्टेदार वाघिणीची वन खात्याच्या खास निमंत्रित शार्पशूटरने गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेला २ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अवनीचा तो थरार, शिकार याबाबींना उजाळा मिळाला आहे.राळेगाव, केळापूर, घाटंजी तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये दहशत निर्माण केलेल्या अवनी या पट्टेदार वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास बोराटी जंगल परिसरात वन खात्याच्या असगरअली या शार्पशूटरने टिपले. दुसºया वाघिणीच्या मुत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली असता तिला नेम धरुन गोळी मारण्यात आली. त्यानंतर अवनीच्या दोन्ही बछड्यांच्या शोधार्थ वन खात्याने मोहीम राबविली. त्यापैकी एक बछडा वन खात्याच्या हाती लागला असून त्याला पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित सोडण्यात आले. त्याचे वय दीड वर्ष असावे असा वन खात्याचा अंदाज आहे. अवनीचा दुसरा बछडा मात्र अद्यापही वन खात्याच्या हाती लागला नाही. त्याचे लोकेशनही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. १३ शेतकरी-शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या अवनीच्या शोधार्थ हत्ती व पॅराग्लायडिंगची मदत घेण्यात आली होती. अवनी नसली तरी अन्य वाघांची टिपेश्वर व परिसरातील गावांमध्ये दहशत कायम आहे.खर्चाच्या आकड्यांचा संभ्रम अजूनही कायमअवनीला ठार मारण्याचा खर्च दोन ते अडीच कोटी असल्याचे सांगितले जात आहे. वन खाते मात्र हा आकडा अवघा ७० लाख सांगत आहे.ठार मारलेल्या अवनीच्या दोन बछड्यांपैकी एका बछड्याला पकडून त्याला नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. परंतु दुसऱ्या बछड्याचा अद्यापही शोध लागला नाही. गेल्या ५ जुलै रोजी कक्ष क्रमांक ७५२ मध्ये तो आढळून आला. त्याचे पगमार्कही दिसून आले. परंतु त्यानंतर मात्र हा बछडा दिसला नाही. अवनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ७० लाख रूपयांचा खर्च आला.- के.अभर्णा, उपवनसंरक्षकपांढरकवडा वनविभाग

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीण