शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अधिकारी ऐकत नाही, जनतेची कामे होत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:09 IST

केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. परंतु या सत्तेचा पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना कोणताही उपयोग होत नाही. कार्यकर्त्यांमार्फत जनतेची कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत, .....

ठळक मुद्देभाजपा कार्यकर्त्यांची व्यथा : मंत्र्यांकडून सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. परंतु या सत्तेचा पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना कोणताही उपयोग होत नाही. कार्यकर्त्यांमार्फत जनतेची कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत, अशा शब्दात भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शनिवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापुढे आपली व्यथा मांडली.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘युफोरिया-१८’ या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी ना. तावडे यवतमाळात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्षाच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.राज्यात भाजपा-शिवसेना युती सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळातील सरकारची तीन ठळक कामे सांगा, अशी विचारणा ना. विनोद तावडे यांनी कार्यकर्त्यांना केली. त्यावर कार्यकर्त्यांकडून ‘एकही नाही’ असे सरसकट उत्तर आले. या उत्तराने ते चक्रावले. त्यांनी पुन्हा हाच प्रश्न केला असता एका कार्यकर्त्याने ‘भाजपा सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात पक्ष कार्यकर्त्याचे कुठलेच काम झाले नाही, कार्यकर्ते पैदल केले’ एवढीच काय ती सरकारची उपलब्धी असल्याचा पाढा वाचला. त्यानंतर उपस्थितांपैकी एका पाठोपाठ कार्यकर्ते हाच सूर आळवताना दिसले. नगरपरिषदेच्या माजी शिक्षण सभापती, बांधकाम सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांनीही आपल्या व्यथा मांडल्या. भाजपाच्या नगरसेविका म्हणाल्या, मी शिक्षण सभापती होते. मात्र प्रशासन स्तरावर काम होत नाही, अधिकारी आमचे ऐकत नाही, त्यावरून ना. तावडे यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करा, त्यातून शासकीय अधिकाºयांवर दबाव निर्माण करा, असा सल्ला दिला. उपाध्यक्षांनी अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा रेटला. यावेळी उपस्थित शिक्षणाधिकाºयांनी संच मान्यतेची अडचण सांगितली. भाजपाचा सरचिटणीसांनी आत्ताच्या पेक्षा १९९५ चे युतीचे सरकार चांगले होते, असे सांगितले. कार्यकर्त्याला या सरकारमध्ये काहीच सोय नाही, कुणाच्याही हाताला काम नाही, कामे बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न या सरचिटणीसांनी विचारला. आर्णी येथील भाजपा तालुकाध्यक्ष बिपीन राठोड यांनी आपल्या शिक्षक भावाच्या प्रकरणाचे ना. तावडे यांना स्मरण करून देत संस्था चालक ऐकत नसल्याचे सांगितले. त्यावर शंभर कार्यकर्ते घेऊन जाऊन त्या संस्था चालकाला धडा शिकवा असा सल्ला तावडेंनी दिला. हाच धागा पकडून नगपरिषदेच्या माजी बांधकाम सभापतींनी मी अधिकाºयाला धडा शिकविला, मात्र मलाच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागले. तरीही काम झाले नाही. काम होत असेल तर माझी पुन्हा धडा शिकविण्याची तयारी असल्याचे हा पदाधिकारी म्हणाला.सरकारला तीन वर्षे होऊनही मंडळ, महामंडळ, जिल्हा, तालुका समित्यांवर नियुक्त्या झाल्या नाही. या सरकारमध्ये कार्यकर्त्यांसाठी काहीच नसल्याची भावना भाजपाच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी एक सुरात बोलून दाखविली.अभाविपचा घेरावशिक्षणमंत्री विनोद तावडे हे भाजपा जिल्हाध्यक्षाच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी जात असताना त्यांच्या घराजवळच अचानक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडविला. यावेळी हातात फलके झळकवून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ना. तावडे वाहनाबाहेर आले. त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन निवडणुका आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.