अवैध खरेदी रोखण्यासाठी पथक : थेट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना होणार रद्दयवतमाळ : गत सहा वर्षांपासून यवतमाळ बाजार समितीमध्ये कापसाचा लिलावच होत नव्हता. थेट जिनींगच्या नियमाने कापसाचे दर पडले होते. याला लगाम घालण्यासाठी बाजार समितीने लिलाव करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी बाजार समितीमध्ये कापसाची बोली लागली. यामुळे बाजार समितीमध्ये प्रथमच कापसाच्या वाहनाच्या रांगा पहायला मिळाल्या. यानंतर थेट खरेदी झाल्यास व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई बाजार समिती करणार आहे. कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे.जिल्हा मुख्यालयाच्या बाजार समितीमध्ये कापसाचा लिलावच होत नव्हता. यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना इतर ठिकाणी कापूस न्यावा लागत होता. बाजार समितीच्या निर्णयाने गुरूवारी कापसाची बोली लागली. शेतकऱ्यांच्या कापसाला गुरूवारी चांगला दर मिळाला. ही प्रक्रिया अखंड चालू रहावी म्हणून बाजार समितीने खास उपाययोजना केल्या आहे. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार सदस्यीय भरारी पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये दोन संचालक आणि दोन बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. हे पथक शहरातील जिनींग प्रेसिंगची पाहणी करेल. बाजार समितीचे टोकन असल्याशिवाय कापसाची गाडी न घेण्याच्या सूचना जिनींगला देण्यात आल्या. यानंतरही गाडी घेतली गेली तर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांनी दिली.बाजार समितीचा सेस बुडविणाऱ्या सुवालाल आणि जैन ट्रेडर्सला बाजार समितीने नोटीस बजावली आहे. या नोटीसचे उत्तर खासगी व्यापाऱ्याने दिले नाही. परवाना न घेताच गावात खुलेआम धान्य खरेदी केली ओह. यामुळे मोठ्या प्रमाणात बाजार समितीचा सेस बुडाला आहे. या प्रकरणात कारवाई करण्याचा ठराव गुरूवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.दिवसात दोन वेळा होणार लिलावयवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढे एका दिवसात दोनवेळा कापसाचा लिलाव होणार आहे. सकाळी आणि दुपारी असा दोन वेळा कापसाचा लिलाव होणार आहे. त्यासाठी सोमवारी वेळापत्रक जाहीर होणार आहे. गुरूवारी संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, उपसभापती गजानन डोमाळे, किशोर इंगळे, राजेंद्र गिरी, सुनिल डिवरे, विजय मुंधडा, संजय राठोड, भेडेकर, डाखोरे, किशोर बढे यांचा यामध्ये समावेश होता. (शहर वार्ताहर)
एपीएमसीत सहा वर्षांनी कापूस लिलाव
By admin | Updated: November 11, 2016 02:12 IST