लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेऊन खºया आदिवासींच्या सवलती लुटणाºयांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शासनाने बोगस आदिवासींवर कारवाइं करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज संघटनांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बुधवारी आदिवासी समाज संघटनांनी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीत सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वडगाव येथील राणी दुर्गावती चौकातून रॅलीला सुरूवात झाली. शहरातील विविध मार्गाने फिरून ही तिरंगा चौकात पोहोचली. तेथे छोटेखानी सभा झाली. सभेला विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी मार्गदर्शन् केले.यानंतर जिल्हा प्रशासनाला एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. यावेळी राजू चांदेकर, किशोर उईके, शैलेश गाडेकर, विनोद सुरपाम, प्रा.माधव सरकुंडे, डॉ. विवेक चौधरी, एम.के.कोडापे, किरण कुमरे, प्रफुल्ल आडे, बंडू मसराम, शैलेश मडावी, शेखर मदनकर, सचिन चचाने, वैशाली केराम, पूनम केराम, वैशाली उईके यांच्यासह शेकडो समाजबांधव उप्स्थित होते.
आदिवासी समाजाच्या रॅलीन वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:17 IST
बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेऊन खºया आदिवासींच्या सवलती लुटणाºयांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले.
आदिवासी समाजाच्या रॅलीन वेधले लक्ष
ठळक मुद्देजागतिक आदिवासी दिन : सवलती लुटणाºयांवर कारवाई करा, प्रशासनाला निवेदन