शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शिपायाच्या निवृत्तीला पोलीस महासंचालकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:31 IST

चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या महिला शिपायाच्या सेवानिवृत्ती समारंभाला खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी उपस्थिती दर्शवून ‘पद नव्हे कामच मोठे’ हा मंत्र अवघ्या यंत्रणेच्या मनावर ठसविला.

ठळक मुद्देमुख्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलययंत्रणाही अवाक्, महिलेला अश्रू अनावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस अधिकारी म्हणजे तापट माणूस, हा गैरसमज इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे. होय, प्रामाणिकपणा दिसला की कर्तव्यकठोर अधिकारीही साध्या शिपायाच्या सत्कारासाठी आपुलकीने उभा राहतो. चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या महिला शिपायाच्या सेवानिवृत्ती समारंभाला खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी उपस्थिती दर्शवून ‘पद नव्हे कामच मोठे’ हा मंत्र अवघ्या यंत्रणेच्या मनावर ठसविला.शिर्षस्थ अधिकाऱ्याने एखाद्या अगदीच कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या निरोपाला हजर राहण्याचा हा प्रसंग महासंचालक कार्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. या प्रकाराची राज्यभर पोलीस दलात चर्चा असून महासंचालक कार्यालयातील यंत्रणाही हा प्रसंग पाहून अवाक् राहिली.हंसा अर्जुन वोरा असे या कार्यालयीन महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी ३१ आॅक्टोबर रोजी त्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम राज्य पोलीस मुख्यालयाच्या तळमजल्यावर पार पडला. यावेळी सरदार पटेल यांच्या जयंती कार्यक्रमातून खास वेळ काढून स्वत: राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल या कार्यक्रमाला हजर झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल, पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश प्रामुख्याने उपस्थित होते. स्वत: महासंचालक शिपाई महिलेच्या निरोप समारंभाला उपस्थित आहेत, त्यांना आपल्या बरोबरीने बसविले आहे हे चित्र पाहून मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला. यावेळी मनोगत व्यक्त करताना हंसा वोरा यांना अश्रू अनावर झाले. आपली एवढ्या वर्षाची सेवा आज फलद्रूप झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

निवृत्तीलाच सर्व लाभ देऊ - महासंचालकपोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल म्हणाले, २००१ ला आपण पहिल्यांदा या महासंचालक कार्यालयात आलो, तेव्हापासून हंसा वोरा यांचे काम पाहतो आहे. अतिशय प्रामाणिकपणे व सचोटीने त्या काम करतात. आपण केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच दिवशी त्याचे निवृत्तीचे सर्व लाभ त्याच्या हाती सोपविण्याची परंपरा आहे. हीच परंपरा येथेही सुरू केला जाईल. लगतच्या काळात सेवानिवृत्त होणाºया कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी निवृत्तीचे लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. पुढील वेळेपासून हा बदल करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे महासंचालकांनी सांगितले. महासंचालकांचे उपसहायक अरविंद जाधव यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.महासंचालकांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे. या आगळ्यावेगळ्या निरोप समारंभाची पोलीस मुख्यालयात सुरू झालेली चर्चा राज्य पोलीस दलात सर्वदूरपर्यंत पोहोचली आहे.

टॅग्स :Policeपोलिस