शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:01 IST

तालुक्यातील कवडीपूर (तांडा) येथे वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या वीज वितरणच्या पथकावर ग्रामस्थाने हल्ला केला.

ठळक मुद्देअभियंता जखमी : पुसद तालुक्याच्या कवडीपूर येथील घटना

आॅनलाईन लोकमतपुसद : तालुक्यातील कवडीपूर (तांडा) येथे वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या वीज वितरणच्या पथकावर ग्रामस्थाने हल्ला केला. यात सहायक अभियंता जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण वाढल्याने पुसद ग्रामीण-२ वितरण केंद्राचे पथक मंगळवारी कवडीपूर तांडा येथे पोहोचले. या पथकाकडे वीज चोरी पकडण्याचे काम सोपविण्यात आले होते. सहायक अभियंता एस.एस. इवनाते यांच्या नेतृत्वातील सहा कर्मचाºयांचे पथक कवडीपूर येथे पोहोचले. या पथकाने कवडीपूर येथील तुकाराम राठोड, रामराव भीवा जाधव, अरुण जनार्दन चव्हाण, प्रमोद धाडसू आडे यांच्या घरातील वीज चोरी पकडून पथकाने पंचनामा केला.यानंतर सदर पथक प्रकाश सकरू जाधव यांच्या घरी गेले. तेथे घरातील इलेक्ट्रीक मोटरची पाहणी केली असता ती बंद आढळली. मात्र घरातील लाईन सुरू होती. त्याची पाहणी केली असता प्रकाश जाधव याने जवळपास ७०० फूट अंतरावरील रोहित्रावरून थेट काळ्या रंगाची सर्व्हिस केबल टाकल्याचे आढळून आले. त्याने चोरीचा वीज पुरवठा घेतल्याचे दिसून आले. या केबलमुळे काही नागरिकांना धोका उद्भवू शकत होतो, त्यामुळे ती काढणे गरजेचे होते. वीज वितरण पथकातील कर्मचाºयांना सहायक अभियंता इवनाते यांनी केबल काढण्याचे आदेश दिले. लाईनमन हरिदास सोळंके पोलवर चढून केबल काढत असताना किशोर जाधव यांनी अडथळा निर्माण केला. त्यानंतर संतापलेल्या किशोर जाधव व त्याचा मुलगा शुभम जाधवने वीज कर्मचाºयांचे मोबाईल हिसकले. नंतर कर्मचाºयांना थापडांनी मारहाण करून पेंचीस व पेचकसने पथकावर हल्ला केला. किशोरच्या पत्नीनेही कुकरने मारहाण केली. यात सहायक अभियंता इवनाते जखमी झाले. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या इतरांवरही पेंचीस व पेचकसने हल्ला करण्यात आला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.अशोक पवार यांच्या खिशातील वीज बिलाचे दहा ते बारा हजार रुपये व त्याच्या पावत्या फाडण्यात आल्या. पथकासोबत असलेला पोलीस कर्मचारी आनंद कुबडे याने पवार यांना सोडविले. सहायक अभियंता इवनाते यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी किशोर सकरु जाधव, शुभम किशोर जाधव, बिंदूबाई किशोर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वीज अधिकारी, कर्मचारी संतप्तया घटनेने वीज कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी कृती समिती स्थापन करून बुधवारी धरणे आणि निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुभम जाधव अद्याप पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.