शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

युती शासनाच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:14 IST

राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला.

ठळक मुद्देचित्रा वाघ : दारव्हा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला. शिक्षेचे प्रमाण मात्र कमी असताना गृह खाते उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केला.येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आयोजित महिला मेळावा व महिला बचत गट मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. मंचावर प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शंकराव राठोड, उत्तमराव शेळके, राकाँ महिला जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, राजेंद्र पाटील, डॉ.महेंद्र लोढा, निलीमा काळे उपस्थित होत्या. चित्राताई वाघ म्हणाल्या, सध्याच्या काळात कोणताही घटक सुखी नाही. ३० टक्के तरुणाईने विश्वास ठेवून युतीचे सरकार आणले. मात्र बेरोजगारीमुळे आज त्या तरुणांचा आक्रोश पाहायला मिळतो. वाढत्या महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडले असुन त्यांना घर कसे चालवावे, असा प्रश्न पडला. मात्र सरकार ठोस उपाययोजना करीत नाही. ‘उज्वला’ योजनेतून केवळ गॅस देऊन चालत नाही, तर त्यासाठी ९०० रूपयांचे सिलिंडर घ्यावे लागते, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी अर्ध्या किमतीत गॅस सिलिंडर, सॅनिटरी पॅड जीएसटी मुक्त करावे, आदी मागण्या त्यांनी केल्या.कार्यक्रमाला हरिश कुडे, लालजी राऊत, नानाभाऊ भोकरे, अ‍ॅड.दिलीप देशमुख, मनीषा काटे, प्रवीण खेवले, लालसिंग राठोड, युवराज अर्मळ, सारिका ताजने, इरफान अकबानी आदी उपस्थित होते. संचालन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गोदावरी पाटील, प्रास्ताविक प्रा.सुषमा गावंडे, तर आभार शहराध्यक्ष नलिनी राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासिर शेख, प्रा.सुभाष गावंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.बोंडअळीची मदत, विमा भरपाई, हल्लाबोलचे यशबोंडअळीची मदत आणि पीक विम्याची नुकसान भरपाई, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नेर तालुक्यात भेट दिल्यानंतर केलेला पाठपुरावा आणि पक्षातर्फे यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल मोर्चा काढून केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमदार ख्वाजा बेग यांनी पत्रकार परिषदेत केला. आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ुजनतेशी संवाद साधून या सरकारचे खरे रूप उघड करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोग लागू करणे, दोन कोटी नोकऱ्या, महागाई कमी करणे, महिला सुरक्षा, टोलमुक्त व खड्डेमुक्त महाराष्ट्र, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र एकही पूर्ण केले नसून हे केवळ फेकू सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस