वणी : महाराजस्व अभियान महसूल विभागातर्फे तालुक्यातील घोन्सा येथील आदर्श हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय बोबडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच निरूपमा पथाडे, उपसरपंच अनिल साळवे, पोलीस पाटील सचिन उपरे, मंडळ अधिकारी नितीन बांगडे, तलाठी अशोक मडपाचे उपस्थित होते. संचालन रवींद्र उईके यांनी केले. विद्यार्थ्यांचा वेळ व पैैशाची बचत व्हावी म्हणून महाराजस्व अभियानांतर्गत घोन्सा येथील आदर्श विद्यालयातील १०० विद्यार्थ्यांचे महसूल विभागाने प्रस्ताव गोळा केले होते. त्यापैैकी ४० विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजुर झाल्यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हे प्रस्ताव गोळा करण्यासाठी घोन्सा येथील कोतवाल महादेव गाते यांनी परीश्रम घेतले. विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय न गाठता थेट शाळेतच प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. आभार राज उमरे यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
राजस्व अभियानांतर्गत प्रमाणपत्रांचे वाटप
By admin | Updated: January 1, 2017 02:26 IST