शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:28 IST

‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे.

ठळक मुद्दे शेतीव्यवसायच धोक्यात : एका मागून एक आंदोलनांची साखळी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. निसर्ग पिकू देत नाही आणि शासन पिकलेला विकू देत नाही. त्यामुळे शेतकरी आता अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत नाईलाजाने शेती व्यवसाय करीत आहे. वणी परिसरात मागील दोन महिन्यापासून शासनाशी लढा देण्यासाठी कोठे ना कोठे असंघटीत आंदोलन करीत आहे.कृषी प्रधान म्हणून मिरविणाºया देशात शेती व्यवसाय नापसंतीला उतरला आहे. उत्तम नोकरी-मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असा व्यवसायाचा उलटा क्रम येण्याला कारणीभूत कोण, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी नको रे बाप्पा शेतीचा व्यवसाय म्हणून आपली शेती मक्त्याने देण्याच्या मानसीकतेत आले आहे, कधी अतिवृष्टीने तर कधी पावसाअभावीव शेतीवर दुष्काळाची वेळ येते, हे अस्मानी संकट शेतकºयांच्या पाचविलाच पुजलेले असते, तर एखादे वर्षी निसर्गाने साथ दिली, तर उत्पन्न वाढलेले दिसते पण शासनाकडून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. हे सुलतानी संकट शेतकºयांच्या मानगुटीवर असतेच. शेतकºयांच्या हतबलतेचा आधार घेऊन विरोधी पक्षाकडून शासनाच्या या सुलतानशाहीवर तोंडसुख घेण्याची संधी विरोधक सोडत नाही. मात्र हेच बोंबा मारणारे नेते शासनाच्या राजगादीवर स्वार झाले की शेतकºयांच्या यातना विसरून जातात, याचा अनुभव शेतकरी घेत आहे. विरोधात असताना कापसाला सात हजार रूपये व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव मागणारे आता सत्तेवर असूनही भाव का देऊ शकत नाही, याचे उत्तर शेतकºयांनाही शोधता आले नाही. शेतीत काम करणारे मजुरही आता मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मानवनिर्मीत हे तिसरे संकट अलीकडे शेतकºयांना त्रासून सोडत आहे. त्यात वाघाची दहशत मजुरांना शेती कामाकडे वळू न देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.जंगलातील रोही व रानडुकरांचे कळप शेतकºयांच्या उभ्या पिकांचा फडशा पाडत आहे. या जंगली प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा म्हणून अनेक गावातील शेतकºयांनी गावोगावी उपोषण सुरू केले होते. वनमंत्र्याने शेतकºयांना आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली. शेतकºयांना शेतीला कुंपन करण्यासाठी अनुदानावर मदत पुरविल्याशिवाय या संकटातून शेतकरी मुक्त होणार नाही. आता परतीच्या पावसाने कापूस पिकावर संकट आणले. कापसाची बोंडे सडून जमिनीवर सडा पडला. काही बोंडे झाडालाच काळी पडली. शिल्लक राहिलेल्या बोंडावर अळींनी एवढे आक्रमण केले आहे, की बोंडातून कापसाऐवजी गुलाबी अळ्या निघत आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी म्हणून ब्राम्हणी व निळापूरचे शेतकरी गावातच उपोषणाला बसले आहे. त्यांच्याकडे शासनाचे अजूनही लक्ष गेले नाही.भाववाढीची मागणीशासन कर्मचाºयांचा महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढविले. खासदार-आमदार यांचे वेतन व भत्ते बिना आंदोलनाने झटक्यात वाढविते. तर मग शेतकºयांच्या शेतमालाचे हमी भाव मागणी असूनही का वाढविले जात नाही. हा शेतकºयांचा सवाल आहे. महागाईची झळ शेतकºयांना बसत नाही काय, याचे उत्तर शासनाने द्यावे म्हणजे झाले.