शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

बियाणे कंपन्यांवरील दाखल गुन्ह्यांचा अहवाल मागितला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:42 IST

कित्येक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले असून या दाखल गुन्ह्यांचा अहवाल गुणवत्ता नियंत्रण संचालकांनी (पुणे) मागितला आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना न जुमानणाऱ्या कंपन्या निशाण्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात हजारो हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली. परंतु कित्येक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले असून या दाखल गुन्ह्यांचा अहवाल गुणवत्ता नियंत्रण संचालकांनी (पुणे) मागितला आहे.सोयाबीनच्या बियाणे कंपन्यांनी यावर्षी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. एक तर मुळात यावेळी बियाण्यांच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. शेतकऱ्यांकडून अवघ्या ४० रुपये किलोने सोयाबीन खरेदी केले गेले. परंतु हेच सोयाबीन बियाणे म्हणून विकताना कंपन्यांनी त्याचा दर ८० ते ९० रुपये प्रति किलो असा निश्चित केला. ठोक बियाणे वितरक व कंपन्यांच्या संगनमताने या वाढीव दराने एमआरपी नोंदविली गेली. एवढ्या महागीचे बियाणे घेऊनही ते उगवलेच नाही. तपासणीअंती या बियाण्यांची उगवण क्षमता अवघे २५ टक्के असल्याचे आढळून आले. नामांकित कंपन्यांचे महागडे बियाणे घेऊनही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. कंपन्या मात्र पावसाने दगा दिल्याचे कारण पुढे करीत आहे.

परवाना निलंबन-रद्दचे आदेशबियाणे न उगवल्याच्या राज्यभरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. त्या पार्श्वभूमीवर आता बियाणे न उगवलेल्या कंपन्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदोष बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुनश्च बियाणे उपलब्ध करून देऊन कंपन्यांनी नुकसानभरपाई देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही दखल न घेणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाईसोबतच परवाना निलंबन, रद्द करणे आदी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.कृषी आयुक्तालयातील संचालक (गुणवत्ता नियंत्रण) यांनी राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना किती कंपन्यांविरुद्ध कुठे कुठे गुन्हे दाखल झाले, याचा अहवाल मागितला आहे. नांदेड, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये गुन्हे नोंदविले गेले आहे.यवतमाळात पोलीस संरक्षण मागितलेमहाबीजच्या बियाण्यांबाबतही काही ठिकाणी तक्रारी आहेत. त्यावर बियाणे तत्काळ बदलवून देण्याच्या सूचना महाबीजला करण्यात आल्या आहे. अन्य काही कंपन्यांची मात्र मुजोरी कायम आहे. मध्यप्रदेशातील एका कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी आहेत. यवतमाळ जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांच्या प्रचंड तक्रारी आहेत. शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे यवतमाळातील प्रमुख वितरकांनी कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

टॅग्स :agricultureशेती