शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम खात्याला एशियन बँकेचे अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 11:09 IST

निधीच्या टंचाईचा सामना करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आता राज्यातील रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ हजारो कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे.

ठळक मुद्देरस्ते-पुलांची बांधणी ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’तील प्रकल्पांना हजारो कोटींच्या कर्जाचा हातभार

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निधीच्या टंचाईचा सामना करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आता राज्यातील रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ हजारो कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. या अर्थसहाय्याच्या बळावर बांधकाम खात्याचे अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) यापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला (पीएमजीएसवाय) अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले होते. त्या बळावरच ‘पीएमजीएसवाय’ने रस्ते उभारणीचे दोन टप्पे पूर्ण केले व आता तिसºया टप्प्यातील प्रस्ताव हाती घेतले आहेत. राज्यात ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ प्रकल्पांतर्गत हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. ३० हजार कोटी रुपये बजेट असलेल्या या प्रकल्पातून दहा हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. परंतु या प्रकल्पाला निधीची अडचण निर्माण झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या महाराष्ट्र शासनाची तिजोरी रिकामी आहे. प्रकल्पांसाठी पैसा नाही म्हणून एशियन डेव्हलपमेंट बँकेने आता सार्वजनिक बांधकाम खात्याला मदतीचा हात दिला आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’तील रस्ते व पुलांसाठी कर्ज स्वरूपात बांधकाम खात्याला निधी दिला जाणार आहे.

पहिला टप्पा ६०३ किलोमीटरचापहिल्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोकण, पुणे, नाशिक, अमरावती या प्रादेशिक विभागातील ६०३ किलोमीटर रस्ते बांधकामासाठी एशियन डेव्हलप्मेंट बँक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’तील ३४४ किलोमीटरच्या रस्त्यांचे डीपीआर (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केले जात आहे. तर २५६ किलोमीटरच्या रस्त्यांचे डीपीआर बनविण्यासाठी कन्सल्टंट नेमण्यात आले आहेत. याशिवाय ७३२ किलोमीटरचे रस्तेही ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ प्रकल्पातून बांधण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे नियोजन आहे.यवतमाळातील ५५ किमीचा मार्ग‘एडीबी’च्या अर्थसहाय्याने हाती घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील ६०३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमध्ये अमरावती विभागांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम-पुसद या ५५ किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश आहे. तर अमरावती, अकोला जिल्ह्यातील रस्त्यांचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक