शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन बदलताच यवतमाळात क्रिकेट बुकींना मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 22:25 IST

मध्यंतरीच्या काळात मोठे जुगार अड्डे, सट्टा, क्रिकेट बुकी जिल्ह्याबाहेर पळाले होते. आता मात्र पूरक वातावरण तयार होत असल्याने त्यांनी यवतमाळ शहरासह वणी व इतर भागात जम बसविला आहे. यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम चांगलाच गाजला आहे. अनेक सुखवस्तू कुटुंबातील सदस्य क्रिकेट सट्ट्यात बरबाद झाले आहेत. त्यांच्याकडून वसुलीसाठी आता गावगुंडांचा वापर केला जात आहे. यातून गावगुंडांनाही रोजगार मिळाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मोठे अर्थकारण क्रिकेट सट्टा, जुगार अड्डे, अवैध सावकारी, भूखंड आणि तस्करी भोवती फिरते आहे. यातूनच अमाप पैशाची उलाढाल होते. हा पैसा सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. यंदा आयपीएल हंगामात क्रिकेट बुकींना मोकळे रान मिळाले. प्रशासनात सोईस्करपणे बदल घडविला. मध्यंतरीच्या काळात मोठे जुगार अड्डे, सट्टा, क्रिकेट बुकी जिल्ह्याबाहेर पळाले होते. आता मात्र पूरक वातावरण तयार होत असल्याने त्यांनी यवतमाळ शहरासह वणी व इतर भागात जम बसविला आहे. यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम चांगलाच गाजला आहे. अनेक सुखवस्तू कुटुंबातील सदस्य क्रिकेट सट्ट्यात बरबाद झाले आहेत. त्यांच्याकडून वसुलीसाठी आता गावगुंडांचा वापर केला जात आहे. यातून गावगुंडांनाही रोजगार मिळाला आहे. 

वसुलीतून गावगुंडांना दिला जातो रोजगार  

जुगार क्लबही जोरात सुरू; आलिशान फार्म हाऊसवर लाखोंची उलाढाल   - दडपणाखाली मागील दोन वर्ष अवैध व्यवसाय सुरू होते. आता मोकळा हात चालवता येईल, अशी आशा सर्वांनाच लागली आहे. त्यामुळेच जोरकसपणे जुगार क्लब सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आठ दिवसांपूर्वी आलिशान फार्म हाऊसवर बुकी व जुगार क्लब भरविणाऱ्यांची जंगी बैठक झाली. दोन वर्षातील नुकसान भरुन काढायचे नियोजन करण्यात आले. - सध्या आलिशान फार्म हाऊसवरील जुगार क्लब जोमात सुरू आहे. तेथे कुणीच फिरकणार नाही, याची शाश्वती मिळाली आहे. त्यामुळेच दिवसाला येथे कोट्यवधींची उलाढाल होते. शिवाय महानगरातून आंबटशौकिनांसाठी ललना देखील बोलविल्या जात आहे. हा गैरप्रकार एकदा चव्हाट्यावर आला. आता तिथे कुणी फिरकण्याची हिंमत करणार नाही. हा सर्व प्रकार थांबविण्याचे आव्हान नव्या प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. 

कुंटणखान्यामुळे तरुणाई होतेय बरबाद- मालमत्ता विषयक गुन्हे वाढले आहे. चोरीचे सत्रच सुरू आहे. याचे प्रमुख कारण व्यसनाधीनता व अल्पवयीनांना लागलेला कुंटणखान्याचा नाद आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे सध्या तरी दुर्लक्ष होत आहे. अनेक गुन्ह्यांचे मूळ येथून सुरू होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस  उपाययोजनेची गरज आहे.

 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी