शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

माँ दुर्गेचे आगमन

By admin | Updated: October 14, 2015 02:50 IST

विमानातून पुष्पवृष्टीयवतमाळ : ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत माँ दुर्गेचे आगमन झाले आणि यवतमाळच्या प्रसिद्ध दुर्गोत्सवाला प्रारंभ झाला.

विमानातून पुष्पवृष्टीयवतमाळ : ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत माँ दुर्गेचे आगमन झाले आणि यवतमाळच्या प्रसिद्ध दुर्गोत्सवाला प्रारंभ झाला. विमानातून करण्यात आलेली पुष्पवृष्टी आणि विविध प्रांतातील परंपरागत नृत्याने माँ दुर्गेचे स्वागत करण्यात आले. यवतमाळ शहर माँ दुर्गेच्या स्वागतासाठी सज्ज होते. सकाळपासून भक्तांचे लोंढे यवतमाळात येत होते. विविध मंडळांनी मिरवणुका काढून देवीची स्थापना केली. यवतमाळातील आर्णी मार्ग, लोखंडीपूल परिसर, पॉवर हाऊस, वडगाव आणि माळीपुरात मंडळांनी देवी नेण्यासाठी गर्दी केली होती. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या बालाजी चौकातील दुर्गोत्सव मंडळाने शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी केली. विविध मंडळांच्या शोभायात्रेत प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले होते. बेटी बचाव यासह इतर विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत ढोलताशांचा गजर सुरूच होता. कडाडणारे ढोलताशे अन् परंपरागत लोकनृत्ययवतमाळ : कडाडणारे ढोलताशे, गुलालांची उधळण, जय माता दीचा गजर आणि विविध प्रांतातील लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या नृत्य आदींनी यवतमाळकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यवतमाळच्या प्रसिद्ध दुर्गोत्सवानिमित्त विविध मंडळांनी शोभायात्रा काढून माँ दुर्गेचे विधिवत स्थापना केली. सुवर्ण महोत्सव साजरे करणाऱ्या बालाजी दुर्गोत्सव मंडळाची शोभायात्रा सर्वाधिक लक्षवेधक होती. यवतमाळ शहरातील दुर्गोत्सव म्हणजे जिल्ह्यासाठी पर्वणी असते. विविध देखावे आणि कार्यक्रमांसाठी हा दुर्गोत्सव प्रसिद्ध आहे. मंगळवारी घटस्थापनेनिमित्त शहरातून निघालेल्या दुर्गोत्सवाने यवतमाळकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले.बालाजी चौकातील दुर्गोत्सव मंडळाने हिमालयाची विशाल प्रतिकृती साकारली असून त्याच तोडीची स्थापनेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रांतातील लोकनृत्य सादर करणारे कलावंत होय. सजविलेल्या बैलगाडीवर सनई चौघडा वाजविणारे कलावंत नागरिकांचे लक्ष वेधत होते. लेझीम पथक, पोतराज, गोंधळी नृत्य, मणिपुरी नृत्य, राजस्थानी नृत्य, मयूर नृत्य, कुचीपुडी नृत्य यासह विविध नृत्य कलावंतांनी सादर केले. शहराच्या प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक मार्गक्रमण करीत होती. त्यावेळी विमानातून पुष्पवृष्टी केली. येथील आझाद मैदानावर स्थापन करण्यात येणाऱ्या गुजरात नवरात्रोत्सव मंडळाची शोभायात्राही लक्षवेधक होती. भाविकांनी पारंपरिक गुजराती पद्धतीने वेशभूषा केली होती. तर आदिवासी वेशभूषेतील कलावंत नृत्य सादर करीत होते. ढोल-ताशा रॉक बॅन्डच्या सोबतीला परंपरागत वाद्यही होते. वडगावच्या सुभाष क्रीडा मंडळाने महाराष्ट्रीयन वेशभूषेत माँ अंबेचे स्वागत केले. हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाच्या शोभायात्रेतील टाळमृदुंगाचा गजर भाविकांना तल्लीन करीत होता.शहरात विविध ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक मंडळाने शोभायात्रा काढली होती. यासोबतच यवतमाळातून मातेची मूर्ती घेऊन जाण्यासाठी ग्रामीण भागातील मंडळाचे कार्यकर्ते विविध वाहनातून आले होते. मातेचा जय जयकार करीत ही मंडळी आपल्या गावी जात होती. येथील लोखंडी पूल, आर्णी मार्ग, वडगाव आणि माळीपुऱ्यात देवीला नेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दुर्गोत्सवासाठी यवतमाळ शहर नटले असून विद्युत रोषणाई आणि देखाव्यांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.