शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीच्या समृद्धीची हवाई सफरसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 21:54 IST

सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती या उपक्रमातून अनेकांना बालवयात हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेऊन यशस्वी झालेली आर्णी येथील समृद्धी रवींद्र खरतडे ही विद्यार्थिनी आता हवाईसफर करणार आहे.

ठळक मुद्देलोकमत संस्काराचे मोती स्पर्धा : नारायणलीला स्कूलची विद्यार्थिनी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती या उपक्रमातून अनेकांना बालवयात हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेऊन यशस्वी झालेली आर्णी येथील समृद्धी रवींद्र खरतडे ही विद्यार्थिनी आता हवाईसफर करणार आहे.‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आली. या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी आर्णी येथील नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी समृद्धी रवींद्र खरतडे हिची निवड करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा म्हणून लोकमत संस्काराचे मोती हा उपक्रम राबविला जातो. ही स्पर्धा १ जुलै ते १० आॅक्टोबर या शंभर दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती. यात आर्णी येथील समृद्धी खरतडे हिची निवड करण्यात आली. ही हवाई सफर एक दिवसाची असून मंगळवार २६ जून रोजी ती विमानाने प्रवास करणार आहे.हवाई सफरसाठी निवड झाल्याबद्दल शाळेकडून गौरव करण्यात आला. यावेळी आर्णीच्या नगराध्यक्ष अर्चना मंगाम, व्यवस्थापक क्रांती प्रवीण मॅकवान, मुख्याध्यापिका दीपाली ठाकरे, समृद्धीचे वडील रवींद्र खरतडे उपस्थित होते. ती आर्णी येथून नागपूरकडे रवाना झाली असून दिल्ली येथे उपराष्टÑपती व्यंकया नायडू यांची भेट घेऊन संवाद साधणार आहे.