लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी/घाटंजी : आर्णी आणि घाटंजी नगरपरिषदेच्या सभापतींची शुक्रवारी अविरोध निवड करण्यात आली. आर्णीत शिवसेना आणि काँग्रेसची युती असून घाटंजीत घाटी-घाटंजीत विकास आघाडीचे वर्चस्व आहे.आर्णी नगरपरिषदेच्या सभापतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शुक्रवारी सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. ंअध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे होते. काँग्रेसचे अन्वरखान पठाण, सुषमा सुरडकर, शिवसेनेचे लक्ष्मण पठाडे, सिंधु पारधी, सुरेखा मेंडके आणि राष्टÑवादीकडून अंजली खंदार, चिराग शाह, स्वाती व्यवहारे, निलंकुश चव्हाण यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेस व शिवसेनेची युती असल्याने राष्टÑवादीच्या उमेदवारांना अनुमोदक मिळाले नाही. त्यामुळे त्यांचे नामांकन रद्द झाले. तर शिवसेना व काँग्रेसच्या उमेदवारांची अविरोध निवड झाली. त्यात बांधकाम सभापती अन्वरखान पठाण, शिक्षण व पाणीपुरवठा सभापती लक्ष्मण पठाडे, आरोग्य सभापती सुषमा सुरडकर, महिला व बाल कल्याण सभापती सिंधु पारधी, उपसभापती सुरेखा मेंडके यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अर्चना मंगाम, नगरपरिषद उपाध्यक्ष राजीव विरखेडे, नगरसेवक आरिज बेग यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.घाटंजीत नगर परिषदेच्या सभापतीपदी घाटी घाटंजी विकास आघाडीचे चारही सभापती अविरोध निवडून आले. त्यात सार्वजनिक बांधकाम अनिल खोडे, शिक्षण सुवर्णा गोमासे, आरोग्य सुमित्रा मोटघरे, महिला व बाल कल्याण अलका जळके, उपसभापती सीता गिनगुले यांचा समावेश आहे. पीठासिन अधिकारी म्हणून एस. भुवनेश्वरी होत्या. यावेळी मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपस्थित होते.सभापतींच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला. पेढे वाढून आनंद साजरा करण्यात आला.
आर्णी, घाटंजीचे सभापती अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:12 IST
आर्णी आणि घाटंजी नगरपरिषदेच्या सभापतींची शुक्रवारी अविरोध निवड करण्यात आली. आर्णीत शिवसेना आणि काँग्रेसची युती असून घाटंजीत घाटी-घाटंजीत विकास आघाडीचे वर्चस्व आहे.
आर्णी, घाटंजीचे सभापती अविरोध
ठळक मुद्देनगरपरिषद विषय समित्या : समर्थकांनी केला विजयी जल्लोष