शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

शेतकऱ्यांसाठी सेनेचा जिल्हाभर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 5:00 AM

उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड.बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख सतीश नाईक, संतोष जाधव, शहर प्रमुख संदीप ठाकरे, निर्मला विणकरे, रेखा भरणे, सुरेखा गवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

ठळक मुद्देदुष्काळी मदत : उमरखेड, महागाव, दारव्हा, आर्णी, घाटंजी, दिग्रस तालुका प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, राज्यपालांनी घोषित केलेली मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आदी मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यात शेतकरी धडक मोर्चा काढण्यात आला. उमरखेड, महागाव, दारव्हा, घाटंजी, आर्णी आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयावर धडक दिली.दारव्हा येथे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड, शिक्षण व आरोग्य सभापती कालिंदा पवार, तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख राजू दुधे, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, जिल्हा परिषद सदस्य राधा थरकडे, अश्विनी कुरसिंग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड.बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख सतीश नाईक, संतोष जाधव, शहर प्रमुख संदीप ठाकरे, निर्मला विणकरे, रेखा भरणे, सुरेखा गवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.घाटंजी येथे तहसीलदार पूजा मातोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नीलेश चव्हाण, मनोज ढगले, आकाश राठोड, गोपीदास राठोड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महागाव येथे शिवसेनेने शेतकरी धडक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. शिवसेना संपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे, रामराव नरवाडे, डॉ.चव्हाण, निर्मला विणकरे आदींनी तहसीलदार नीलेश मडके यांना मागण्यांचे निवेदन दिले.आर्णी येथे शिवसेनेने तहसीलवर धडक दिली. रवी राठोड, पंकज शिवरामवार, उत्तम राठोड, गणेश भगत, सुयोग चिंतावार, दिनेश कर्णावार, लक्ष्मण पठाडे, राजू शिंदे, सुभाष जोगदंडे, जैनुल्ला शेख, शे.सदाम शे. मस्तान, राजेश राठोड, गोपाल गुडलवार, पुरुषोत्तम पवार, संतोष जाचक, अनिल बोईनवार, जनार्दन मामीडवार, स्वप्नील धोटे, लक्ष्मण कुमरे, सुदाम राठोड आदींनी तहसीलदार धीरज स्थूल यांना निवेदन दिले.दिग्रस येथे शिवसेनेने मोर्चा काढून तहसीलदार राजेश वजीरे यांना निवेदन दिले. आमदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती सभापती विनोद जाधव, उत्तम ठवकर, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, संजीव चोपडे, रामभाऊ मारशेटवार, संजय कुकडी, दिवाकर राठोड, डॉ.विष्णू उकंडे, लखन राठोड, आतीश राठोड, राहूल देशपांडे, संजय इकडे, संदीप रत्नपारखी, यादव पवार, सुभाष जाधव, अजय भोयर, तानाजी घुमनर, बाळू जाधव, सुधीर रत्नपारखी, राहुल धुळधुळे, विष्णू रंगोलकर, बालाजी ठाकरे, प्रकाश राऊत, किसन गावंडे, भीमराव मनवर, रामकृष्ण भरणे आदींनी निवेदन दिले.अतिवृष्टीचा फटकाजिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मका आदी पिकांचे नुकसान झाले. उमरखेड तालुक्यात ऊस पिकालाही हानी पोहोचली. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यांना तत्काळ मदत न दिल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप