शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चाेरीतील साेन्याचा यवतमाळात शाेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 00:02 IST

यवतमाळ शहरातील महाकाली मंदिर परिसरात साेने गाळण्याचे काम केले जाते. काही साेने कारागीरसुद्धा येथे आहेत. याच भागातील एका सराफाने पांढरकवडा शहरातील चाेरट्यांकडून चाेरीचे साेने घेतले. याची माहिती मिळताच सहायक पाेलीस निरीक्षक विजय महल्ले हे पथकासह यवतमाळात दाखल झाले. त्यांनी एलसीबीच्या अधिकाऱ्याला साेबत घेऊन चाेरीेचे साेने घेणाऱ्या सराफाला ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चाेरीचे साेने खरेदी करणारे अनेक महाभाग यवतमाळ शहरात आहेत. नागपूर, मुंबई येथील पाेलीस पथकाने यवतमाळात येऊन कारवाई केली आहे. पांढरकवडा शहरात मागील महिन्यात तीन घरफाेडीच्या घटना घडल्या. स्थानिक पाेलिसांनी या चाेरीच्या गुन्ह्याचा तपास करत आराेपींना ताब्यात घेतले. चाेरट्यांनी चाेरीचे साेने यवतमाळातील सराफाला विकल्याची कबुली दिली़. त्यावरून पाेलिसांनी एका सराफाची चाैकशी केली. यवतमाळ शहरातील महाकाली मंदिर परिसरात साेने गाळण्याचे काम केले जाते. काही साेने कारागीरसुद्धा येथे आहेत. याच भागातील एका सराफाने पांढरकवडा शहरातील चाेरट्यांकडून चाेरीचे साेने घेतले. याची माहिती मिळताच सहायक पाेलीस निरीक्षक विजय महल्ले हे पथकासह यवतमाळात दाखल झाले. त्यांनी एलसीबीच्या अधिकाऱ्याला साेबत घेऊन चाेरीेचे साेने घेणाऱ्या सराफाला ताब्यात घेतले. सराफाने चाेरीचे साेने घेतल्याची कबुली दिली़  चाेरीतील  मुद्देमाल घेऊन पाेलिसांनी सराफाला सूचनापत्र दिले आहे. या सराफाला भादंवि ४११ कलमाप्रमाणे आराेपी बनविण्यात येणार आहे. यवतमाळात चाेरीच्या साेन्याची माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अतिशय कमी किमतीत चाेरीचे साेने घेऊन त्याचे गाळप करतात. बरेचदा या साेन्याच्या दागिन्यांचे गाळप करून लगड तयार केली जाते. त्यामुळे हा मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागला तरी त्याची ओळख पटविणे शक्य हाेत नाही. याचा फायदा आराेपींना न्यायालयात मिळताे. चाेरीचा मुद्देमाल घेणारे यवतमाळ शहरात सक्रिय असल्याने येथे घरफाेड्या व चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. यवतमाळातील पाेलिसांचे यावर काेणतेच नियंत्रण नाही. दरराेज घरफाेडी व जबरी चाेरी शहरात हाेत आहेत. 

स्थानिक पाेलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह यवतमाळ शहरात चाेरीचा मुद्देमाल घेणारे काेण आहेत हे सर्वश्रुत आहेत. महानगर, बाहेर जिल्ह्यातील पाेलीस येऊन चाेरीचा मुद्देमाल जप्त करून नेतात. यवतमाळ शहरातील पाेलिसांकडून मात्र काेणतीच कारवाई हाेताना दिसत नाही. शहर, अवधूतवाडी, लाेहारा या तिन्ही पाेलीस ठाण्यातील तपास पथक कधीच चाेरीचा मुद्देमाल घेणाऱ्यांपर्यंत पाेहाेचलेले नाही़ यावरून चाेरीचे साेने घेणाऱ्यांशी स्थानिक पाेलिसांचे हितसंबंध तर जुळेलेले नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

 

टॅग्स :Thiefचोर