शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

सशस्त्र पोलिसांचा जंगलाला वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:48 IST

अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुळमेथे यांच्यावर हल्ला करून त्यांची निघृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम याचा शोध घेण्याची मोहिम अतिशय तीव्र करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमारेकऱ्याचा शोध सुरूच : आरोपीने पुन्हा हल्ला केल्यास गोळी झाडण्याचे आदेश

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुळमेथे यांच्यावर हल्ला करून त्यांची निघृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम याचा शोध घेण्याची मोहिम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. शुक्रवारी भल्या पहाटे पाच वाचता २६ सशस्त्र पोलिसांची १३ पथके हिवरी, रोहपटच्या जंगलात सर्चींगसाठी शिरली.सर्चींगदरम्यान, आरोपीने पोलिसांवर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश गुरूवारी अपर पोलीस अधीक्षक अमरसींग जाधव यांनी दिल्याची विश्वसनिय माहिती आहे. २५ नोव्हेंबरच्या रात्री आरोपी अनिल मेश्राम याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर अनिलने दंडुक्याने हल्ला केला होता. त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुळमेथे जागीच मृत्यूमुखी पडले. घटनेनंतर मारेकरी अनिल मेश्राम घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेवरून पाच दिवस लोटले तरी मारेकरी पोलिसांच्या हाती लागला नाही. खुद्द एका पोलीस अधिकाºयाची निर्घृण हत्या केली जाते आणि त्या मारेकºयाला पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश येत नाही, यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.घटनेपासून आरोपीला पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा संपूर्ण जंगल पिंजून असली तरी मारेकरी पोलिसांना गुंगारा देत आहे. तो हिवरी, रोहपटच्या जंगलातच दडून असल्याची शंका पोलिसांना असून पोलीस या जंगलात त्याचा शोध घेत असले तरी तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. तो गुंगारा देण्यात वाक्बगार असल्याचा पोलिसांचा जुना अनुभव आहे.गुरूवारी पोलिसांनी मारेकºयाला पकडण्यासाठी नवी व्यूहरचना तयार केली. यासाठी एका पथकात दोन सशस्त्र पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून अशी १३ पथके शुक्रवारी पहाटे पाच वाजता रोपहटच्या जंगलात रवाना झाली. या पथकाने साखळी तयार केली असून दोन कर्मचारी एकमेकांपासून ५० फुटांच्या अंतरावरून जंगलात शिरले. उर्वरित पोलिसांनी त्या भागातील रस्त्यावर गस्त घातली. मात्र तरीही सायंकाळी उशिरापर्यंत मारेकरी हाती लागला नव्हता. या मोहिमेत यवतमाळसह पांढरकवडा, पाटण, मुुकुटबन, वणी, मारेगाव शिरपूर येथील पोलीस सहभागी झाले आहेत. आरोपीच्या मनात पोलिसांबद्दल प्रचंड राग आहे. रागाच्या भरात तो पोलिसांवर हल्ला करू शकतो. त्यामुळे पोलीसदेखील सतर्कता बाळगून आहेत.१३ पथकांकडून सर्च, प्रत्येक कर्मचाºयांजवळ पिस्तूलपोलीस अधिकाºयाची हत्या करून फरार झालेला मारेकरी अनिल मेश्राम याने पोलीस यंत्रणेच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने पंचक्रोशीत त्याची दहशत कायम आहे. मारेकºयाने पोलिसांवर हल्ला करू नये, म्हणून सुरक्षेसाठी यवतमाळ येथून पथकातील कर्मचाºयांसाठी २५ पिस्तुल पाठविण्यात आल्या. शुक्रवारी पहाटे हे सशस्त्र पोलिसांचे पथक जंगलात रवाना झाले.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून