शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी येथे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:10 IST

तालुका विधिसेवा समितीच्यावतीने येथे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुका विधिसेवा समितीच्यावतीने येथे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली. न्यायमूर्ती चैतन्य कुळकर्णी, न्यायमूर्ती ए.के. अलमोदी, तहसीलदार सुधीर पवार, रमेश खारोडे, अ‍ॅड.दुर्गादास राठोड, रावसाहेब जुमनाके, किशोर रावते, अ‍ॅड.सुनील व्यवहारे, अ‍ॅड.प्रमोद चौधरी, सरकारी वकील मीना प्रधान, समृद्धी सुनील व्यवहारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री म.द. भारती विद्यालयासमोरून रॅलीला सुरुवात झाली.माहूर चौक, बसस्थानक, शिवनेरी चौक, मेन रोड आदी भागातून मार्गक्रमण करत रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. समृद्धी चिंतावार या विद्यार्थिनीने एकपात्री प्रयोग सादर केला. विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. रॅलीमध्ये लोकमत सखी मंच, संस्कार कलश, लायन्स क्लब, ज्येष्ठ नागरिक मंडळ, गुजराती मंडळ, म.द. भारती शाळा, डॉ.राधाकृष्णन प्राथमिक मराठी शाळा, श्री म.द. भारती महाविद्यालय, सनराईज नर्सरी कॉन्व्हेंट, नारायणलिला, साई ईश्वरी, स्वामी विवेकानंद शाळा, वन विभाग, भगतसिंग विद्यालय, देवराव पाटील कन्या शाळा, गांधीनगर प्राथमिक मराठी शाळा आदींचा सहभाग होता.यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी न्यायमूर्ती चैतन्य कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्त्री भ्रूणहत्त्या थांबविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी किशोर रावते, कांतीलाल कोठारी, दीपक कोठारी, सी.एस. गावंडे, मधुकर ठाकरे, राजेंद्र राऊत, माणिक देशमुख, अ‍ॅड.रवींद्र ठाकरे, अ‍ॅड.सुनील व्यवहारे, दीपाली ठाकरे, ईश्वर दुगड, यादवराव ठाकरे, चित्रा माहुरे, संगीता रावते, सीमा कोठारी, सीमा चिंतावार, संध्या मिर्झापुरे, कल्पना तायडे, विश्वगीता जोशी, राजश्री राठी, सपना नालमवार, अनिता राठोड, सीमा पद्मावार, सुरेखा देमापुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करण्यात आले. रॅलीतील विद्यार्थ्यांना किशोर छल्लाणी यांच्यातर्फे चॉकलेट वाटप करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जागोजागी केली होती.