शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वृक्ष लागवड जनचळवळ करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:27 IST

वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी साधलेला संवाद.

ठळक मुद्देभविष्यात जिल्हा होणार हिरवागार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी साधलेला संवाद.त्याच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वृक्ष लावले जातात काय?वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत पूर्णत: पारदर्शकता आणली आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवड करणारे सर्व स्पॉट आॅनलाईन आहेत. यात कुणाला शंका वाटली, तर ते त्या संकेतस्थळावर जाऊन पाहणी करू शकतात. प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटही देऊ शकतात. यामुळे त्याच जागी पुन्हा वृक्ष लागवड होण्याचा प्रकार थांबला आहे.वृक्ष लागवडीत गैरप्रकार झाला तर?वृक्ष लागवडीत गैरप्रकार घडू नये म्हणून पारदर्शकता आणली. स्मार्टफोनचा वापर करून एका विशिष्ट सॉफ्टवेअरने संकेतस्थळ जोडले. ज्या ठिकाणी वृक्षांची लागवड झाली, त्याचा अक्षांश आणि रेखांश या ठिकाणी दिसतो. एक अक्षांश आणि रेखांश पुन्हा ओव्हरलॅप होत नाही. तेच ठिकाण दाखविले तर हे ओव्हरलॅप दृष्टीस पडेल. अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई व महाराष्ट्र शिस्त नियमानुसार कारवाई होणार आहे.जंगल का वाढत नाही?वृक्षारोपणाचे काम गत तीन-चार वर्षांपासून सुरू झाले. नवीन जंगल तयार होत आहे. प्रत्यक्षस्थळी भेट दिल्यास नवीन जंगल आपल्या दृष्टीस पडतील. सध्या झाडे लहान आहेत. ती मोठी झाल्यानंतर येत्या काळात जंगल वाढलेले दिसतील. यवतमाळ जिल्हा आधीच वनसंपदेने नटलेला आहे. वनांच्या सौंदर्यात भविष्यात भर पडेल. यवतमाळ जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. मात्र बेसुमार वृक्षतोड झाल्याने जंगलाच्या सौंदर्याला बाधा पोहोचली. तथा भविष्यात जंगलामध्ये मोठी वाढ होणार आहे.जिल्ह्यातील १४२ नर्सरीमधून यावर्षी रोपटी आणली जाईल. या नर्सरीत एक कोटी १४ लाख ३७ हजार रोपटी तयार आहे. यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद विभागातील यंत्रणा वृक्ष लागवड करण्यासाठी तयार आहे. खड्डे खोदले जात आहे. त्यात पुढे रोपटी लावली जातील.यंदा दीड कोटी झाडे लावणारवृक्ष लागवड करताना अनेक बारकावे टिपण्यात आले आहे. कमी पाण्यात जगणारे आणि अधिक काळ टिकणारे वृक्ष लावण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार विविध नर्सरीमध्ये रोपटी तयार करण्यात आली आहे. कडूनिंबासारख्या रोपट्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात यावर्षी एक कोटी ३७ लाग रोपटी लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये वनविभागाला ६४ लाख ४७ हजार रोपटी लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींसह विविध संघटना आणि शासकीय विभागांचे सहकार्य मिळणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग