शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:19 IST

येथील नगर परिषदेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत १२ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार असल्याने यवतमाळ शहर सुंदर व स्वच्छ दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : स्थायी समितीची सभा, घनकचऱ्यासाठी ६२ मिनी ट्रक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नगर परिषदेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत १२ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार असल्याने यवतमाळ शहर सुंदर व स्वच्छ दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यवतमाळ नगर परिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभाग घेतला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. त्याकरिता नगरपरिषदेने डीपीआर तयार केला. त्याला मंजुरी देण्यासाठी सभागृहाचा ठराव आवश्यक होता. शनिवारी या ठरावाला मंजुरी देण्यात आली. यात घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरातील ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार आहे. या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. वाहन खरेदीसाठी चार कोटी ८९ लाखांचा निधी आरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र निविदा कमी दराची असल्याने निधी शिल्लक राहणार आहे. या शिल्लक निधीतून पुन्हा २२ जादा वाहने खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली. त्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.या ८४ वाहनांसाठी ८४ चालक आणि ८४ मदतनिसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एक कोटी ९५ लाख रूपये लागणार आहेत. घनकचऱ्यापासून खत निर्मितीसाठी एक कोटी ९२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पथदिव्यांसाठी वापरली जाणारी वीज वाचविण्यासाठी आता एलईडी लाईटचा वापर केला जाणार आहे. या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. सभागृह अद्ययावत करणे, दोन नवीन फॉगिंग मशीन खरेदी करणे, डीडीटी औषधाची फवारणी करणे, आदी प्रस्तावांनाही मंजुरी बहाल करण्यात आली. सभेत १२ कोटी २७ लाख ९२ हजार ९७७ रूपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.शहरात अद्याप समाधानकारक पाऊस बरसला नाही. त्यामुळे काही भागात पाण्याचा प्रश्न कायम आहे. ही पाणीटंचाई निवारण्यासाठी अत्यावशक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होणार आहे. इतर ठिकाणचे टँकर बंद करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.तारांगण निविदा १८ टक्के जादा दरानेनाविन्यपूर्ण योजनेतून नेहरु उद्यान परिसरात तारांगणाची वास्तू उभारली जाणार आहे. त्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. तिनदा निविदा काढूनही एकही निविदा प्राप्त झाली नव्हती. अखेर चौथ्यांदा निविदा काढल्यानंतर गणेश ईनोव्हेशन, राजेंद्र टेकाडे आणि कमर अली यांच्या निविदा प्राप्त झाल्या. यापैकी राजेंद्र टेकाडे व कमर अली या कंत्राटदारांनी निविदेतील शर्ती व अटी पूर्ण न केल्याने त्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. गणेश इनोव्हेशन यांची निविदा १८ टक्के दराने जास्त होती. ही निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली. तिला सभेने मंजुरी बहाल केली.