शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:44 IST

नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी आहे. ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने केली आहे. राज्यातील १५ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक एलआयसी चौकातून निघालेला मोर्चा विविध मार्गाने फिरत तिरंगा चौकात धडकला.

ठळक मुद्देशिक्षकांचा संप : ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात सोमवारी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. मागणीची पूर्तता न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला.नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी आहे. ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने केली आहे. राज्यातील १५ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.स्थानिक एलआयसी चौकातून निघालेला मोर्चा विविध मार्गाने फिरत तिरंगा चौकात धडकला. मोर्चेकऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. १५ मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावे, अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश होता.आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, कोअर कमिटी, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, पेन्शन बचाव कृती समिती, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक आघाडी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, लेखावर्गीय कर्मचारी संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, शिक्षक महासंघ, प्राथमिक शिक्षक संघटना, नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना, शिक्षक परिषद, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना, भारतीय मजदूर संघटना यासह अनेक संघटना आंदोलनात सहभागी होत्या. प्रत्येक संघटनेच्या तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी बैठकांचे सत्र घेऊन मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतरही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळात मोर्चासाठी धाव घेतली होती.मोर्चानंतर तिरंगा चौकात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य समन्वयक मधुकर काठोळे होते. यावेळी अनेकांनी मोर्चेकऱ्याना मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले.

टॅग्स :Teacherशिक्षक