शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत
2
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
3
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
4
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
5
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
6
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
7
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
8
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
9
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
10
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
11
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
12
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
13
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
14
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
15
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
16
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
17
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
18
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
19
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
20
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर

११ हजार शेतकऱ्यांच्या बोगस नोंदणीला ‘एपीएमसी’ जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 7:00 AM

शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या बोगस नोंदणीला कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि सातबारा देणारी महसूल यंत्रणा जबाबदार असल्याचे सीसीआयने म्हटले आहे.

ठळक मुद्दे‘सीसीआय’ने हात झटकलेसातबारा देणाऱ्या महसूल यंत्रणेकडेही संशयाचे बोट

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियामधील कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्यात ‘सीसीआय’ने हात झटकले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या बोगस नोंदणीला कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि सातबारा देणारी महसूल यंत्रणा जबाबदार असल्याचे सीसीआयने म्हटले आहे.‘लोकमत’ने ‘सीसीआय’मधील कापूस खरेदी घोटाळा उघडकीस आणला. त्याची दखल घेऊन सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांनी यवतमाळ जिल्ह्यातून या घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ केला. यवतमाळात आलेल्या पानीग्रही यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. सहकार विभागाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ११ हजार ६०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी केली गेल्याचे आढळून आले. मात्र या बोगस नोंदणीला सीसीआय जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. पानीग्रही म्हणाले, महसूल विभागाचा घटक असलेला तलाठी शेतकऱ्यांना सातबारा देतो, हा सातबारा कृषी उत्पन्न बाजार समिती नोंदणीच्या वेळी प्रमाणित करते. मग त्याला सीसीआय दोषी कसे ?. सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर सातबारा घेऊन येणारा व्यक्ती शेतकरी की व्यापारी हे ओळखायचे कसे ?, सातबारा आणला म्हणजे तोच शेतकरी असे गृहित धरुन त्याचा कापूस खरेदी केला जातो. सातबारावर केवळ कापूस व सोयाबीन असा उल्लेख असतो. अनेकदा त्यावरील सोयाबीन आपल्या सोईने हटविले जाते.

म्हणे, शेतकरीच व्यापारी बनलेसातबारा मिळविणे व त्यावर व्यापाऱ्यांचा कापूस विकणे यामागे अर्थकारण असल्याची बाब त्यांनी मान्य केली. अनेक ठिकाणी शेतकरीच व्यापारी बनल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागाने शेतकऱ्यांना बोगस सातबारा देणे बंद केल्यास कापूस खरेदीत गैरप्रकार करण्यास वावच राहणार नाही, असे पानीग्रही यांनी सांगितले.

सीसीआयच्या काही ग्रेडर्सकडून गैरप्रकारसीसीआयच्या काही केंद्रांवर ग्रेडर्सकडून गैरप्रकार झाला असण्याची शक्यता आहे. मात्र तो सरसकट व सर्वत्र नाही. गैरप्रकार शोधले जात असून संबंधितावर कारवाईही केली जाईल, असे पानीग्रही यांनी स्पष्ट केले. विशेष असे, अनेक खरेदी केंद्रांवर ग्रेडर्स व जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या संगनमताने अन्य जिल्ह्यातील कापूस आणूनही विकला गेला आहे.सातबारा आम्ही प्रमाणित करतो, त्यामुळे त्याला कृषी उत्पन्न बाजार समित्या जबाबदार आहे, हे मान्य. पण कोणत्याही शेतकऱ्याने नोंदणीसाठी आणलेला सातबारा आम्ही नाकारू शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात ११ हजार ६०० पैकी सर्वच नोंदणी बोगस नाही. आधी नोंदणी केली व नंतर कापूस बाहेर विकला असे प्रकार घडले आहे. कळंब बाजार समितीने सर्वप्रथम सर्वेक्षण करून अशी नावे हटविली होती.- प्रवीण देशमुख, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती