शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘एपीसीसीएफ’ मंडेंनी स्पॉट व्हिजीट टाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:41 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात हजारो परिपक्व सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड केली गेली. ही तोड राज्यभर गाजत आहे. परंतु मंगळवारी यवतमाळ दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशोक मंडे यांनी या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देअवैध वृक्षतोड : महामार्गावरील कत्तल दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात हजारो परिपक्व सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड केली गेली. ही तोड राज्यभर गाजत आहे. परंतु मंगळवारी यवतमाळ दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशोक मंडे यांनी या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते.‘एपीसीसीएफ’ अशोक मंडे यांनी यवतमाळ वनवृत्त कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक घेतली. यावेळी वृक्षतोडीवर चर्चाही झाली. परंतु सीसीएफ कार्यालयाने आपल्या स्तरावर सर्वांचे ‘समाधान’ करावे, पीसीसीएफ कार्यालयापर्यंत तक्रारी येऊ देऊ नये, माध्यमांचीही समजूत काढा अशा सूचना मंडे यांनी दिल्याचे सांगितले जाते. मंडे हे अवैध वृक्षतोड झालेल्या महामार्गावर प्रत्यक्ष भेट देऊन स्थितीचा आढावा घेतील, असे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात मंडे यांनी स्पॉट व्हीजीट न करता केवळ कार्यालयात बसून आढावा घेण्यातच धन्यता मानली. त्यांनी या वृक्षतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वनवर्तुळात बोलले जाते.राजकीय वरदहस्त लाभलेल्या एका टोळीच्या म्होरक्याला वृक्षतोडीचा हा कंत्राट दिला गेला आहे. या टोळीने कायदा, नियम धाब्यावर बसवून वृक्ष कटाई केली. त्यातील लाकूड परस्पर विकले. त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून त्याचे ‘लाभार्थी’ही अनेक आहेत. खानापूर्तीसाठी नाममात्र लाकूड दाखवून त्याचा अवघा ४४ लाखांत लिलाव केला गेला. प्रत्यक्षात या मार्गावर वृक्षतोड झालेल्या लाकडांची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगितले जाते.महामार्गासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड मंत्रालयापर्यंत गाजत असल्याचे पाहून स्थानिक वन प्रशासनाने आता त्यात नियम-कायद्यांचा आडोसा घेऊन सारवासारव सुरू केली आहे. अशोक मंडे यांनी टाळलेली स्पॉट व्हीजीट त्याचाच एक भाग असल्याचे मानले जाते.वृक्ष कटाईला राजकीय आशीर्वादनागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण सुरू आहे. या मार्गाचे दोन्ही बाजूने रुंदीकरण केले जात आहे. ते करत असताना चक्क जंगलातच व संरक्षित वनात खोदकाम केले गेले. त्या मधात येणारी परिपक्व सागवान वृक्षे विना परवाना तोडली गेली. वृक्षतोडीचा हा कंत्राट येथील राजकीय अभय असलेल्या एका टोळीच्या म्होरक्याला दिला गेला. या टोळीचे तमाम सदस्य सदर वृक्षतोडीत व्यस्त आहेत. त्यांनी वन खात्याची किंवा वन विषयक कायद्यांची कोणतीही तमा न बाळगता क्रूरपणे सागवान वृक्षांची कत्तल केली.

टॅग्स :forest departmentवनविभाग