शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा

By admin | Updated: June 27, 2015 00:37 IST

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्यावतीने पोलीस मुख्यालयातील...

यवतमाळ : जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्यावतीने पोलीस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, प्रा. शाम मानव, सहअध्यक्ष प्रवीण गांगुर्डे उपस्थित होते. कार्यशाळेत जादूटोणा विरोधी कायद्याच्या पाचव्या कलमानुसार पोलीस निरीक्षकाची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या दर्जाच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुन्हा दाखल करून घेणे, त्याचा तपास करणे, दोषारोप कोर्टात सादर करणे ही महत्वाची कामे दक्षता अधिकाऱ्याकडे राहणार आहे. या विशेष तरतूदीमुळे प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी होऊ शकेल असे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. पोलीस निरीक्षकाने दक्षता अधिकारी म्हणून काम करताना स्वार्थासोबत परमार्थ साधण्याची संधी प्राप्त झाली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमुळे खऱ्या अर्थाने समाजहित साधता येणार आहे, असे ्रप्रा. शाम मानव यांनी सांगितले. नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ठ, अघोरी प्रथा, जादूटोणा याचा अर्थ अनुसूचीमध्ये नमूद केलेली १२ कृत्य, कलमे आहेत. अनुसूचितील १२ कमलातील वर्णन केलेल्या कृती करणे हाच गुन्हा आहे, असे अपर पोलीस अधीक्षक डोळे यांनी सांगितले. जादूटोणा विरोधी संपूर्ण कायद्यातील १२ कलमे आणि मागील एकूण ३४ वर्षातील बुआबाजी, मांत्रिक, तांत्रिक यांचा भांडाफोड केल्यास केसेस विषद करून चमत्कार अशा कृती प्रात्यक्षिकासह त्यातील फसवेगिरी साध्या आणि सरळ भाषेत समजावून कायद्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शाम मानव यांनी केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे व्यवस्थापन पोलीस उप अधीक्षक पी.डी. डोंगरदिवे यांनी केले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)