शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणच ठरणार शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरील उत्तर

By admin | Updated: December 31, 2015 02:47 IST

गेल्या काही काळापासून मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

भारतीय जैन संघटना : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुण्यात शिकविणारयवतमाळ : गेल्या काही काळापासून मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे तेथील मुलांच्या शिक्षणाची आबाळ टाळण्यासाठी २३० मुलांना वाघोली, पुणेच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आसरा देण्यात आला आहे. ही मुले उत्तम शिक्षण घेऊन आयुष्य घडवत आहेत. मराठवाड्यासोबतच विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थितीही अत्यंत शोचनीय आहे. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आणि होत आहेत. त्यामुळे यवतमाळवर भारतीय जैन संघटनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासंदर्भात भारतीय जैन संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुनर्वसन प्रकल्पाचा उद्देशशेतकरी आत्महत्यांची जी विविध कारणे आहेत, त्यामध्ये शिक्षणाचा अभाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था पैशाच्या किंवा वस्तूंच्या रूपात मदत करीत आहेत. सरकारही कर्ज कमी करणे किंवा कर्जमाफी करणे अशा माध्यमातून प्रयत्नरत आहे. मात्र, हे उपाय तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रगत करायचे असेल तर या समाजात शिक्षणाचा टक्का वाढविण्याची गरज आहे. पैशाअभावी शेतकऱ्यांची मुले योग्य त्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षणाचा अभाव असल्याने समोर आलेल्या आर्थिक अडचणीला किंवा सामाजिक-कौटुंबिक समस्यांना कसे तोंड द्यावे, याचे उत्तर शेतकऱ्यांना गवसत नाही. त्यामुळेच ते आत्महत्येच्या निर्णयाकडे वळतात. ही स्थिती बदलण्यासाठी शेतकरी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. ही शिक्षित झालेली मुले निश्चितच आपल्या समाजात जीवनाविषयीचा सकारात्मक विचार पेरण्यासाठी सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास भारतीय जैन संघटनेला वाटतो.मुलींना समानतेची संधीशैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शेतकऱ्यांच्या मुलींनाही समान संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थिनींचीही निवड करून त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण या प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी वर्गातील महिलांमध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुलींची प्राधान्याने निवड करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सुरक्षेचीही हमी घेतली जाणार आहे. याच मुली आपल्या समाजात महिला सबलीकरण घडवून आणि जीवनाविषयचा सकारात्मक संदेश पोहोचवून शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकतील, असा विश्वास भारतीय जैन संघटनेने व्यक्त केला.