शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हायकोर्ट चौकशीतील अभियंत्याला चक्क सचिवाचा दुसराही प्रभार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 15:41 IST

Yawatmal News नागपूर उच्च न्यायालयाने ज्या मुख्य अभियंत्या्च्या कारभारावर ताशेरे ओढून चौकशीचे आदेश दिले त्याच अभियंत्याकडे शासनाने चक्क सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवाचा दुसरा अतिरिक्त प्रभार सोपविल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. 

ठळक मुद्देतीन वरिष्ठांना डावलले, ज्येष्ठतेबाबत खुद्द मंत्र्यांनाही अंधारात ठेवले 

 राजेश निस्ताने    लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर उच्च न्यायालयाने ज्या मुख्य अभियंत्या्च्या कारभारावर ताशेरे ओढून चौकशीचे आदेश दिले त्याच अभियंत्याकडे शासनाने चक्क सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवाचा दुसरा अतिरिक्त प्रभार सोपविल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. 

ए.बी. गायकवाड असे या मुख्य अभियंत्याचे नाव आहे. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई (एमएसआरडीसी) येथे आहे. त्यांच्याकडे आधीच  ‘एमएसआरडीसी’च्या सचिव पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. ३१ ऑक्टोबरला सचिव (बांधकामे) अजित सगने सेवानिवृत्त झाले. त्यांचा अतिरिक्त प्रभारही गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. एकाच मुख्य अभियंत्याकडे सचिव पदाचे दोन अतिरिक्त प्रभार दिले गेल्याने बांधकाम खात्यातील सचिव पदाच्या पदोन्नतीस पात्र वरिष्ठ मुख्य अभियंत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता पहायला  मिळते.  वास्तविक मुंबई मेट्रो रिजनचे एच. ए. वांडेकर, एमएमआरडीएचे ठुबे  व मंत्रालयातील सहसचिव आर. बी. घाडगे हे तीन वरिष्ठ मुख्य अभियंते असताना गायकवाड यांना सचिव पदाचा दुसराही अतिरिक्त प्रभार दिला कसा, हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एफआयआरमुख्य अभियंता गायकवाड हे वादग्रस्त ठरले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्यांच्यावर एफआयआर दाखल आहेत. गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी २९ ऑक्टोबर रोजी यवतमाळशी संबंधित  एका प्रकरणात सुनावणी करताना बेकायदेशीरपणे वागलेले मुख्य अभियंता (एनएच) ए.बी. गायकवाड यांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. सचिव किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ही चौकशी करावी व महिनाभरात अहवाल सादर करावा असे निर्देशही न्यायालयाने दिले. त्यानंतर दोनच दिवसात  गायकवाड यांना सचिवाचा आणखी एक अतिरिक्त प्रभार दिला गेल्याने बांधकाम प्रशासन उच्च न्यायालयालाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. 

‘जीएडी’ऐवजी उपसचिवाने काढला आदेशसामान्य प्रशासन विभाग कनिष्ठाकडे प्रभार देणार नाही याची जाणीव झाल्याने गायकवाड यांच्या प्रभाराचा आदेश बांधकाम उपसचिवाने जारी केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनाही तीन मुख्य अभियंत्यांच्या ज्येष्ठतेबाबत अंधारात ठेवले गेले. 

उल्हास देबडवारांचा ‘नो-रिस्पॉन्स’या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम सचिव (रस्ते) उल्हास देबडवार यांच्याशी ‘लोकमत’ने व्हॉटसॲप व मेसेजद्वारे संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून ‘नेहमीप्रमाणे’ कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ‘पीएमजीएसवाय’चा प्रभारही ‘ज्युनिअर’कडे  ! मुंबईचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव किडे सेवानिवृत्त झाले. त्यांचा अतिरिक्त प्रभार पुणे येथील ‘पीएमजीएसवाय’चे  ज्युनिअर असलेले मुख्य अभियंता कातकडे यांना सोपविण्यात आला.  सचिवाच्या तीन जागा रिक्त सार्वजनिक बांधकाम खात्यात बांधकामे, एमएसआरडीसी व पीएमजीएसवाय या सचिवांच्या तीन जागा रिक्त आहे. त्यानंतरही वरिष्ठ अभियंत्यांना वेळीच पदोन्नती देणे टाळले जात आहे. त्यासाठी आरक्षणाचे कोर्टकचेरीतील वाद हे कारण सातत्याने पुढे केले जाते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय