शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:11 IST

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारासाठी राज्यातील सात प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१८ आॅगस्टला वितरणराज्यातील सात प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारासाठी राज्यातील सात प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील या निवडक शेतकऱ्यांना दिवंगत मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ३९ व्या स्मृतिदिनी १८ आॅगस्टला पुरस्काराचे वितरण केले जाईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री मदन येरावार, बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व केंद्र प्रमुख डॉ.सैयद शाकीर अली, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित केले जाणार आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. याशिवाय कपाशीवर बोंडअळीचे नियंत्रण या विषयावरील पुरस्कारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे डॉ.व्ही.चेन्नाबाबू नाईक यांची निवडही घोषित करण्यात आली. पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक आमदार मनोहरराव नाईक, स्वागताध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, प्रा.आप्पाराव चिरडे, प्रा.गोविंद फुके आदी उपस्थित होते.

पुरस्कारासाठी निवड झालेले शेतकरीविठ्ठलराव गणपत घारे, माजी आमदार (काळुस्ते ता. इगतपुरी जि. नाशिक- भातशेती), ब्रह्मदेव नवनाथ सरडे (सोगाव पूर्व ता. करमाळा जि.सोलापूर- ऊस उत्पादन), आनंदराव नाथा गाडेकर (बोरबन ता. संगमनेर जि.अहमदनगर- निर्यातक्षम डाळींब), किरण नवनाथ डोके (कंदर ता. करमाळा जि. सोलापूर- केळी उत्पादन), रवींद्र माणिकराव मेटकर (म्हसला -बडनेरा जि. अमरावती- कुक्कुटपालन), सुरेश प्रकाशराव पतंगराव (अंबोडा ता.महागाव जि.यवतमाळ- रेशीम शेती), श्याम मांगीलाल गट्टाणी (जानेफळ ता.मेहकर जि.बुलडाणा, सीताफळ).

टॅग्स :Vasantrao Naikवसंतराव नाईक