शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

यवतमाळात अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव

By admin | Updated: February 1, 2015 23:05 IST

श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक श्री संघाच्यावतीने येथील केसरिया भवनमध्ये अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २ ते १२ फेब्रुवारीदरम्यान विविध धार्मिक

यवतमाळ : श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक श्री संघाच्यावतीने येथील केसरिया भवनमध्ये अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २ ते १२ फेब्रुवारीदरम्यान विविध धार्मिक सोहळ््याने हा महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवात भगवान श्री सुमतीनाथ, श्री आदिनाथ, श्री पार्श्वनाथ, श्री सीमंधस्वामी यांच्या मूूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तसेच गुरू गौतम स्वामी, श्री कलापूर्णासुरी महाराज गुरूमंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. महोत्सवाचा २ फेब्रुवारीला प्रारंभ होत असला तरी रविवारी प्रतिष्ठाचार्य श्रीमद् विजय पूर्णचंद्रसुरीश्वरजी महाराजांचा मंगल प्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी २७ साध्वी आणि सात साधुंच्या समवेत श्रावक, श्राविका उपस्थित होत्या. महोत्सवाची सुरूवात सोमवारी सकाळी स्नात्रपुजा अभिषेकाने केली जाणार आहे. यात जलयात्रा विधान, कुंभस्थापना, दीपक स्थापना, माणकस्तंभ स्थापना आणि ज्वारारोपणाचा विधी केला जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रतिष्ठिताचार्य श्रीमद् विजय पूर्णचंद्रसुरीश्वरजी यांचा ४३ वा दीक्षा दिन चारित्र्य वंदना समारोहाच्या रुपात साजरा केला जाणार आहे. रात्री आंगी-रोशनी-भक्ती संध्या होणार आहे. मंगळवारी दादा गुरूदेव पूजन होणार आहे. यासाठी विदर्भातील प्रसिद्ध गुरू कोठारी यांची हौजी भक्तीसंध्या आयोजित केली आहे. बुधवारी ४ फेब्रुवारीला ९९ प्रकारची पुजाविधी होणार आहे. गुरूवारी १२ व्रत पूजन आणि रात्री भक्तीसंध्या आयोजित केली आहे. महोत्सवाचा मुख्य सोहळा ६ फेब्रुवारीला प्रभुचे चवन कल्याण, जन्मकल्याण, दीक्षा कल्याण केवळ ज्ञान कल्याणक, मोक्ष कल्याणक, हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी उजैन येथील आशुतोष मंडळाच्या २४ कलावंतांचा संच भक्ती प्रदर्शन करणार आहे. सायंकाळी मां की ममता या विषयावर भक्ती संध्या आहे. ७ फेब्रुवारीला प्रभूचवन कल्याणक अंजनशलाका नाट्य प्रस्तुती होणार आहे. १०८ पार्श्वमहापूजन यासोबतच जालना येथील मेहूल रुपडा भक्तीमंडळ भक्तीसंध्या सादर करणार आहे. ८ फेब्रुवारीला प्रभुचा जन्मकल्याणक नाट्यप्रस्तुती सादर केली जाणार आहे. ६४ इंद्रव्दारा मेरूशिखरावर अभिषेक हे याचे विशेष आकर्षण राहणार आहे. दुपारी १८ अभिषेक, रात्री हैद्राबाद येथील १२ वर्षीय संयम नाबेडा यांची भक्तीसंध्या आहे. ९ फेब्रुवारीला प्रभूची जन्ममहोत्सव नाट्यप्रस्तुत वेदनिय कर्मनिवारण पूजा होणार आहे. नाशिक येथील भावेश शाहा यांची भक्तीसंध्या आहे. १० फेब्रुवारीला दीक्षा कल्याणक नाट्यप्रस्तुती सादर होणार प्रतिष्ठा चढावे की बोली लागणार आहे. कुमारपाल महाराज महाआरती करणार आहे. रात्री अंजनशलाका विधी केला जाणार आहे. ११ फेब्रुवारीला महामंगलकारी प्रतिष्ठा विधान सोहळा आहे. यावेळी मंदिरावर मानव विरहीत विमानातून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. १२ फेब्रुवारीला अखेरच्या दिवशी नवनिर्मिती प्रतिष्ठीत झालेल्या व्दाराचे उद्घाटन केले जाणार आहे. ७० भेदी पूजा केल्यानंतर या सोहळ््याची सांगता होणार आहे. जैन समाज बांधवांनी सोहळ््याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (शहर वार्ताहर)