शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अनिताताई नाईक यांचे राष्ट्रवादीतर्फे नामांकन

By admin | Updated: October 28, 2016 02:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुसद नगराध्यक्ष पदासाठी अनिताताई मनोहरराव नाईक यांनी गुरुवारी नामांकन दाखल केले.

नगराध्यक्ष निवडणूक : नगरसेवकांसाठी पाच जणांचे अर्जपुसद : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुसद नगराध्यक्ष पदासाठी अनिताताई मनोहरराव नाईक यांनी गुरुवारी नामांकन दाखल केले. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तसेच नगरसेवकांसाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले आहे. भाजपा आणि शिवसेनेचा अद्याप उमेदवार निश्चित नसून काँग्रेसने उमेदवार घोषित केला असला तरी नामांकन मात्र दाखल करण्यात आले नाही.पुसद नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ता आहे. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जात असल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता होती. अखेर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांच्या पत्नी अनिताताई नाईक यांनी नामांकन दाखल केले. अनितातार्इंनी नामांकन दाखल केल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दुसरीकडे काँग्रेसने दोन दिवसापूर्वी मुंबईत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून शुभांगी पानपट्टे यांच्या नावाची घोषणा केली होती. परंतु त्यांनी अद्यापही नामांकन दाखल केले नाही. शिवसेना व भाजपा पक्षाने अद्यापपर्यंत आपले उमेदवारच निश्चित केले नाही. नामांकन दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असून आॅनलाईन प्रक्रियेत वेबसाईडची गतीही संथ आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी धांदल उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नगरसेवक पदासाठी गुरुवारी भाजपाच्या एका उमेदवारासह इतर चार जणांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात भाजपाच्या ज्योती संतोष मुकेश, अपक्ष उमेदवार अहेमद अशपाक, जुबेर अगवान, शेख आसीफफनबी आणि कुंदा राजेश चिद्दरवार यांचा समावेश आहे. तर शंकर बोधणे यांनी बुधवारी नामांकन दाखल केले होते. २४ आॅक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र पहिले दोन दिवस उमेदवारांनी नामांकनच दाखल केले नाही. तिसऱ्या दिवशी एका उमेदवाराने नामांकन दाखल केले. गुरुवारी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २९ आॅक्टोबर ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असून येत्या दोन दिवसात नामांकनाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले आणि सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी अजय कुरवाडे काम पाहत आहे. (प्रतिनिधी)