शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जनावर तस्करीत आलिशान वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:32 IST

कत्तलीसाठी जनावरे नेण्याकरिता आता आलिशान वाहनांचा वापर केला जात आहे. सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ वाहनातून ६ जनावरांची सुटका करण्यात आली. वडकी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्कॉर्पिओ जप्त : सहा जनावरांची सुटका, वडकी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : कत्तलीसाठी जनावरे नेण्याकरिता आता आलिशान वाहनांचा वापर केला जात आहे. सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ वाहनातून ६ जनावरांची सुटका करण्यात आली. वडकी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून संशयित वस्तू पांढरकवडाकडे जात असल्याची माहिती पोलीस शुभम सोनुले यांना मिळाली. त्यावरून वाहन वडकी येथे थांबविण्याना प्रयत्न झाला. मात्र हे वाहन पळून गेले. जमादार राजू मोहूर्ले व पोलीस शुभम सोनुले यांनी पाठलाग केला. वेगात असलेले हे वाहन त्यांना सापडू शकले नाही. पुढे राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या मदतीने पाठलाग सुरु केला. स्कॉर्पिओ उमरी गावात शिरली. वाहन चालक व सहकारी शेतात वाहन सोडून पळून गेले. पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या स्कॉर्पिओमध्ये सहा जनावरे होती. अजहर खान अब्दुल्ला खान (२३) व अख्तर अहमद सत्तार अहमद कुरेशी (३०) दोघेही रा.नागपूर यांना ताब्यात घेतले. जनावरांचे पाय दोरीने बांधून वाहतूक केली जात होती. प्रकरणी उपनिरीक्षक दीपक काक्रेडवार यांच्या तक्रारीवरून कारवाई केली.

टॅग्स :Crimeगुन्हा