शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’त बदल्यांमध्ये दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:10 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती विभागात वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. यात दुजाभाव झाला असल्याची ओरड सुरू आहे. प्रामुख्याने यवतमाळ विभागातील कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने इतरत्र हलविल्याचा आरोप केला जात आहे.

ठळक मुद्देअमरावती विभाग : आचारसंहिता संपताच ३० जणांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती विभागात वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. यात दुजाभाव झाला असल्याची ओरड सुरू आहे. प्रामुख्याने यवतमाळ विभागातील कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने इतरत्र हलविल्याचा आरोप केला जात आहे. काही विभागात मुक्कामी कर्मचाऱ्यांची अर्थात अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्यांची गर्दी आहे. त्यांची बदली करण्यात हा विभाग विसरला आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. अमरावती विभागात येत असलेल्या विभागीय कार्यालयातील ३० कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. यासाठी कर्मचाऱ्यांकडून पर्याय मागण्यात आले होते. प्रत्यक्षात बदली करताना पर्यायाव्यतिरिक्त गाव देण्यात आले. विशेष म्हणजे, अमरावती, अकोला विभागातील कर्मचाऱ्यांना त्याच जिल्ह्यात बदली दिली आहे. यवतमाळातील काही कर्मचाºयांना मात्र जिल्ह्याबाहेर फेकण्यात आले आहे.बदली झालेले कर्मचारी वर्षा-दोन वर्षात सेवानिवृत्त होणारे आहेत. शासकीय सेवेचा शेवटचा कार्यकाळ गृह जिल्ह्यातच व्हावा, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते आणि तसे संकेतही आहेत. तरीही येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. विनंती बदल्यांचाही विचार केला गेला नाही. या सर्व प्रकारामुळे आधीच कर्मचाऱ्यांची टंचाई असलेल्या यवतमाळ विभागात पुन्हा खड्डा पडला आहे. शिवाय बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी राजकीय अथवा इतर प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल, असेही बजावण्यात आले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्यायकारक आहे. वरिष्ठांकडून याची दखल घेतली जावी.- राजाराम विठाळकर, सरचिटणीस, मजीप्रा कर्मचारी संघटना

टॅग्स :Waterपाणी