शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अन् वृद्धांच्या अश्रूंना मिळाली मोकळी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:23 IST

त्यांचे आपुलकीचे शब्द, अन् मायेचा आधार मिळताच वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. आ आनंदात वृद्धांनी आपल्या आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली.

ठळक मुद्देदोला महाराज वृद्धाश्रम : विजय दर्डा यांच्या भेटीने सर्वच गहिवरले

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : त्यांचे आपुलकीचे शब्द, अन् मायेचा आधार मिळताच वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. आ आनंदात वृद्धांनी आपल्या आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली.हा प्रसंग होता तालुक्यातील उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमातील. नुकतीच ८ नोव्हेंबरला वृद्धाश्रमाला लोकमत एडोटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी भेट दिली. त्यांनी खासदार असताना आपल्या विकास निधीमधून वृद्धाश्रमाला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध दिला होता. त्यातून वृद्धाश्रमात सभागृह बांधकाम करण्यात आले. त्याचे लोकार्पण विजय दर्डा यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमाला उपस्थित विजय दर्डा यांनी आपल्या परिवारातील अनेक घटना विषद केल्या. वृद्धांशी आपलेपणाने हितगुज केले. त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधला. आई-वडिलांच्या आशिवार्दानचे मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, असे सांगितले. आई-वडिलांच्या आशीवार्दाने आणि संस्कारामुळेच खºया अर्थाने यावर्षीची दिवाळी तुमच्यासोबत आनंदाने साजरी करीत असल्याचे विजय दर्डा यांनी सांगितले.याप्रसंगी विजय दर्डा यांनी बºयाच वर्षांनंतर मी माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करीत असून त्याचा अतिव आनंद होतो आहे, असे सांगताच उपस्थित वृद्धांसह अनेक मान्यवरांना गहिवरून आले. खुद्द विजय दर्डा यांना राहावले गेले नाही. त्यांनी आपली मान्यवरांतील खुर्ची सोडून समोर बसलेल्या म्हाताºया आई-वडिलांमध्ये बैठक मारली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. हा क्षण अत्यंत भाऊक होता. त्यामुळे वृद्धांनीही आपल्या आनंदाश्रूंना मोकळी वाट करुन दिली. ज्यांनी नाकारले, त्यांच्यापेक्षा परकेच आपले असल्याची भावना वृद्धांच्या चेहºयावर उमटली होती. हे क्षण कायमचे मनात कोरले गेले.वृद्धाश्रमातील वृद्धांना जेवढी आर्थिक मदतीची गरज आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे संत दोला महाराज वृद्धाश्रमाला परिसरातील प्रत्येक तरुणाने भेट देऊन वृद्धांशी संवाद साधला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना विजय दर्डा यांनी स्वत: वृद्धांच्या गोतावळ्यात बसून संवाद साधला. त्यांच्या आपुलकीने वृद्धांच्या जगण्याला आणि वृद्ध सेवक शेषराव डोंगरे यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली. हा दिवस खुद्द विजय दर्डा यांच्यासाठीही अविस्मरणीय ठरला.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा