शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

...अन् चक्क हाताने उकरला रस्ता; रात्रभरात उरकले काम : मेजदा ते वाढोणा मार्गाचे डांबरीकरण

By विलास गावंडे | Updated: June 2, 2024 20:42 IST

मेजदा ते वाढोणा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रात्री ११:०० वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी गावकरी जागे झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली.

पारवा (यवतमाळ) : गावातून गेलेला रस्ता गुळगुळीत झाल्याचे पाहून नागरिकांना आनंद झाला. पण, तो औटघटकेचा ठरला. रात्रभरात उरकलेल्या कामाचे पितळ सकाळी उघडे पडले. झालेला डांबरी रस्ता चक्क हाताने उकरला जात आहे. संबंधित यंत्रणा हे काम पुन्हा करून घेते की, कंत्राटदाराची पाठराखण करते, याकडे मेजदा येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मेजदा ते वाढोणा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रात्री ११:०० वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी गावकरी जागे झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली. तेव्हा रस्ता उकरत असल्याचे लक्षात आले. चक्क हाताने रस्ता उकरत असल्याने या कामात झालेला गोंधळ लक्षात आला. डांबरीकरण करताना रस्त्यावरील धूळ, माती झाडण्यात आली नाही. त्यावरच डांबरीकरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

रस्त्याचे काम करताना संबंधित विभागाचे कुठलेही अधिकारी उपस्थित नव्हते. कंत्राटदाराने मनमानी पध्दतीने काम केले. झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुभाष कुळमते, खुशाल सुरपाम, संदीप खाटे, गणेश झाडे, ओम रवी घराटे, विष्णू पुसनाके, ईश्वर खाटे, प्रशांत आडे, प्रकाश नारनवरे, उमेश कुडमते आदींनी ही मागणी लावून धरली आहे. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.