शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

...अन् त्यानं दारूची तस्करी करण्यासाठी चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स केली खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 16:37 IST

दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते.

यवतमाळ : दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते. यवतमाळातील एका तस्करानं चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली आहे. येथील भोसा बायपासवर दारू भरत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. कपिल अरुणराव गजभिये (२७, रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी) असे या तस्कराचे नाव आहे. त्याने एम.एच.३१-सीबी-९८६१ क्रमांकाची ट्रॅव्हल्स दारूसाठी वापरत होता.रॉयल स्लिपर कोच नावाने ही ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करीत होती. काही दिवसापूर्वी शहर पोलिसांनीसुद्धा याच ट्रॅव्हल्ससह दारू घेऊन जाताना पांढरकवडा बायपासवर कपिल गजभिये याला ताब्यात घेतले होते. विशेष पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचून मंगळवारी रात्री भोसा बायपासवर कारवाई केली. यावेळी ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत पोत्यात भरलेल्या देशी दारूच्या चार हजार ८०० बॉटल्स् मिळून आल्या.या ट्रॅव्हल्सचा चालक शिवाजी दिनकर देवकते (३८, रा. चिखली ह.मु. जामनकरनगर) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तस्कर आता थेट ट्रॅव्हल्स सारख्या वाहनाचा वापर करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एलसीबीचे प्रमुख प्रदीप सिरस्कर, एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख जमादार सय्यद साजीद, अजय डोळे, अजय ढोले, वासू साठवणे, योगेश डगवार, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे यांनी केली.