यवतमाळ : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळच्या विविध क्षेत्रांसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन येथील अमोलकचंद विधि महाविद्यालयाला स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे नाव देण्याच्या ठरावाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली.
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांनी यवतमाळसह राज्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे कर्मभूमी असलेल्या यवतमाळ येथील गोधनी रोडवरील विद्या प्रसारक मंडळ संचालित अमोलकचंद विधि महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने विद्या प्रसारक मंडळाने तसा ठराव पारित करून अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाकडे पाठविला होता. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या ठरावाला मान्यता दिल्यानंतर जुलै २०२४ मध्ये यासंबंधीची अधिसूचना पारित केली. त्यास महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्यता देत आदेश पारित केला. त्यास महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्यता देत आदेश पारित केला. त्यामुळे हे विधि महाविद्यालय आता स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यवतमाळ या नावाने ओळखले जाईल, असे संस्थेचे सचिव सी. ए. प्रकाश चोपडा आणि प्राचार्य डॉ. विजेश मुणोत यांनी कळविले आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता या महाविद्यालयाला बार • कॉन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असून, सध्या तीन आणि पाच वर्षांचा एलएल.बी. आणि दोन वर्षांचा एलएल.एम. अभ्यासक्रम, याबरोबरच पीएच.डी. रिसर्च सेंटर, पी.जी. डिप्लोमा अभ्यासक्रमही येथे सुरू आहे.
● देशातील नामांकित लॉ कॉलेज म्हणून महाविद्यालयाची ओळख निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे, संस्था व्यवस्थापनाने कळविले आहे.
दरम्यान, विधि महाविद्यालयाला • श्रद्धेय बाबूजींचे नाव मिळाल्याने विविध क्षेत्रांतून आनंद व्यक्त होत आहे.