शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एमपीडीए कायद्यांतर्गत अमित यादव स्थानबद्ध; जिल्हा कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 18:58 IST

जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्ध करण्यात आले

यवतमाळ: लोहारा पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात गुंड अमित राजकुमार यादव (28 वर्ष) याला जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. अमित यादव हा सन 2009 पासून नियमितपणे खून, घातक शस्त्रे वापरून खुनाच्या प्रयत्नासह दंगा, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे अशा प्रकारे शरीराविरुद्ध, मालमत्तेविषयक गंभीर गुन्हे सातत्याने करीत होता. त्यामुळे लोहारा परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षितेतची भावना निर्माण झाली होती. परिणामी सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत होता. त्याच्याविरुद्ध आजपर्यंत केलेल्या प्रतिबंधक कार्यवाहीचा कुठलाही परिणाम होत नसल्यामुळे अमित यादव विरुद्ध लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी धोकादायक व्यक्ती या सदराखाली जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हा दंडाधिकारी यांनी या प्रस्तावाच्या आधारे गुंड अमित यादवला स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमित केल्याने त्याला 21 ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात येथे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लुले, सहाय्यक फौजदार नरेंद्र मानकर, आशिष भुसारी यांनी पार पाडली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ