शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

अमेरिकेच्या विद्यार्थ्यांचे उमरखेडमध्ये शैक्षणिक धडे

By admin | Updated: July 8, 2015 00:10 IST

भारतातून परदेशात त्यातही अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र प्रगत असलेल्या अमेरिकेच्या एका विद्यापीठातील चार प्राध्यापक आणि सात विद्यार्थी ...

स्टडी अ‍ॅब्रॉड प्रोग्राम : ओहियो विद्यापीठाचे चार प्राध्यापक, सात विद्यार्थी दाखल उमरखेड : भारतातून परदेशात त्यातही अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र प्रगत असलेल्या अमेरिकेच्या एका विद्यापीठातील चार प्राध्यापक आणि सात विद्यार्थी उमरखेड सारख्या मागास तालुक्यात येऊन शैक्षणिक धडे घेत आहे. अमेरिकेच्या ओहियो विद्यापीठाच्या स्टडी अ‍ॅब्रॉड उपक्रमांतर्गत ही मंडळी सध्या उमरखेडमध्ये दाखल झाली आहे.येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात हे परदेशी पाहुणे आता धडे गिरवत आहे. या महाविद्यालयाचे संजीवक दिवंगत डॉ. आत्माराम गावंडे महाविद्यालयाला तिसरे अपत्य मानत होते. महाविद्यालयाच्या विकासासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. भारतातील चांगले ते अमेरिकेत गेले पाहिजे, अमेरिकेतील चांगले भारतात आले पाहिजे, असे ते सांगत होते. यासाठीच त्यांनी अमेरिकेतील अथेन्स येथील ओहियो विद्यापीठाला मोठी देणगी दिली. या विद्यापीठात डॉ. आत्माराम व डॉ. सुशीला गावंडे अध्यासन निर्माण झाले आहे. यातूनच गो.सी. गावंडे महाविद्यालय आणि ओहीओ विद्यापीठात सामंजस्य करार झाला. त्याचाच एक भाग म्हणून ओहियो विद्यापीठाने आपले चार प्राध्यापक आणि सात विद्यार्थी भारतात खास करून उमरखेडमध्ये पाठविले.ही मंडळी महिनाभर राहून धार्मिक, सामाजिक तळाला भेटी देणार आहे. शिक्षण, समाज, संस्कृती, धर्म, स्त्री जीवन, राजकीय व सामाजिक जीवन जवळून अभ्यासणार आहे. उमरखेडमध्ये दाखल झालेल्यांमध्ये प्रा.जुली अ‍ॅने, प्रा. ब्रायन हेगण, प्रा.हॅडी फॅथरीन, प्रा. अ‍ॅरॉन ग्लेन यांच्यासोबत विद्यार्थी एलिसा मायकेल, एन्समीगर, टेलर एलिसा, सॅन्ससमॅन, कोरटीनी लेन क्रिस्टैनी, आॅलीव्हिया अरलीन गिल्टनर, मार्ग्यालिट लीना ब्रुच, सीमा लॅन पीपीन्स आणि इबेरली ग्रेस सी यांचा समावेश आहे. हा उपक्रम पुढे अनेक वर्ष चालू राहणार आहे. काही वर्षानंतर उमरखेडचे विद्यार्थी अमेरिकेतील ओहीयो विद्यापीठात जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव देवसरकर, सचिव डॉ. या.मा. राऊत, नियामक मंडळाचे अध्यक्ष राम देवसरकर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वि.ना. कदम, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यात सहभागी झाले आहे. अमेरिकेतून आलेले हे विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षणाचे धडे घेत असल्याने प्रत्येक जण उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत असतात. (शहर प्रतिनिधी)