यवतमाळ : परिवहन विभागाने रुग्णवाहिकेच्या अंबरदिव्याचा रंग बदलविल्याने रुग्णवाहिका चालकांसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. सुधारित नियमाप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अंबरदिवा निळा करण्यात आला आहे. पूर्वी रुग्णवाहिकेचा दिवा निळा होता आता तो जांभळ््या रंगाचा करण्यात आला आहे. मात्र बाजारात जांभळ््या रंगाचा अंबरदिवाच उलपब्ध नसल्याने गेल्या अनेक महिन्यापासून रुग्णवाहिका अंबरदिव्याविनाच धावत आहेत. जिल्ह्यातून गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येते. त्यामुळे रुग्णांची गरज ओळखून विविध समाजसेवी संस्था, राजकीय संघटना, पुढारी यांच्या नावाने खासगी रुग्णवाहिका रस्त्यावर धावत आहेत. जिल्ह्यात बहुतांश मारुती व्हॅन असेलल्या रुग्णवाहिकांचीच संख्या अधिक आहे. सहा महिन्यापूर्वी शासनाच्या निर्णयावरून रुग्णवाहिकेच्या अंबरदिव्याचा रंग बदलविण्यात आला. पूर्वीचा निळारंगाचा दिवा हा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरटीओ आणि इतर अधिकाऱ्यांच्या वाहनावर लावण्यात आला आहे. रुग्णवाहिकेला निळ््या रंगाऐवजी जांभळ््यारंगाचा अंबरदिवा लावण्याची सूचना दिली आहे. प्रत्यक्षात मात्र खुल्या बाजारात कुठेच जांभळ््यारंगाचा अंबरदिवा उपलब्ध नाही. त्यामुळे अंबरदिव्याशिवायच रुग्णवाहिका धावत आहे. बरेचदा रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यानंतर वाहतुक नियम तोडत भरधाव वेगाने निघून जावे लागते. विशेष करून रात्रीच्या वेळेस रुग्णवाहिकेवर अंबर दिवा नसल्याने वाहतूक पोलिसांच्या कारवाईला समोरे जावे लागते. रुग्णवाहिकेचे जांभळ््या रंगाचे दिवे उलब्ध होईपर्यंत निळ््यारंगाचा दिवा सुरू ठेवावा, अशी मागणी रुग्णवाहिका चालकानी परिवहन विभागाकडे केली होती. मात्र हे अधिकारी काही एक ऐकून घेण्याच्या मानसिकतेते नाही. त्यामुळे आता रुग्णवाहिका चालक अडचणीत सापडले आहेत. अंबरदिवा नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी अपघात होण्याची शक्यता आहे. इतर वाहनाना रात्रीच्या वेळे सायरन ऐकू येईलच याची शाश्वती राहत नाही. परिणामी रुग्णवाहिकेला मोकळी बाजू दिली जात नाही. या सर्व अडचणींनी रुग्णवाहिका चालकांची डोकेदुखी वाढली आहे. जांभळ््या रंगाचे अंबरदिवे मिळेपर्यंत शिथिलता द्यावी अशी मागणी चालकांकडून केली जात आहे. मात्र दिवा नसल्याने रुग्णवाहिका चालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अंबरदिव्याविना धावताहेत रुग्णवाहिका
By admin | Updated: December 20, 2014 22:46 IST