शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या फुलांवर अळ्यांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:45 IST

गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबोंडअळीची भीती : कळंब तालुक्यातील शेतकरी चिंतेत, कृषीच्या मार्गदर्शनाची गरज

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा कंपन्यांकडून केला गेला. मागील वर्षी हा दावा फोल ठरला. त्यामुळे अनेकांच्या शेतीची वाताहत झाली. परंतु कपाशीला सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी पुन्हा यावर्षी कपाशीची लागवड केली. नाही म्हटले तरी प्रत्येक कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची धाकधुक होतीच. ती आता खरी ठरायला लागली आहे. अनेकांच्या शेतातील कपाशी फुलावर आली. या फुलात अळी आढळून येत आहे. हीच अळी बोंडामध्ये प्रवेश करुन पूर्ण बोंड खराब करते, याचा मागील वर्षी अनुभव आलेला आहे.बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे व प्रकाश सापळे (लाईट स्ट्रॅप) लावण्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी ही उपाययोजना अंमलात आणली. परंतु या प्रयोगामुळे बोंडाची अळी पूर्णत: आटोक्यात येईल, अशी स्थिती नाही. कारण बहुतांश फुलात अळीचा पादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरुन अळीला आटोक्यात आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन औषधांची गरज आहे. कपाशीवर बोंडअळीचे प्रमाण अधिक वाढण्यापूर्वी या उपाययोजना आवश्यक आहे.शेतकरी दशोधडीला लागणार - आनंदराव जगतापयावर्षीही फुलावर अळी आली. हीच अळी बोंडात जाते. माझ्या शेतात सर्व उपाययोजना करुनही अळी आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे अळीच येणार नाही, असे संशोधन करुन बियाणे निर्माण करणे गरजेचे आहे. नाही तर शेतकरी वर्ग दशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरुच- कृषी अधिकारीअळीला अटकाव करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळत आहे. अळीला नष्ट करण्यासाठी निंबोळी अर्काचा फवारा मारण्याचा सल्ला देण्यात येत आहे, अशी माहीती पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती