शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधित सर्व रुग्णांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार - पालकमंत्री मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 21:56 IST

जिल्ह्यात किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना बळीराजा चेतना अभियानातून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना बळीराजा चेतना अभियानातून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व बाधित तसेच उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांनासुध्दा ही मदत मिळणार आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मुख्यमंत्री वैद्यकीस सहायता निधी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरवार उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेपेक्षा जास्त खर्च झाला असेल अशा रुग्णालयांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे मदत देण्यात येईल.

अडचणीत असलेल्या सर्व शेतक-यांच्या वैद्यकीय उपचारासाठी झालेला खर्चसुध्दा देण्यात येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. ज्या 131 आजारांवर केवळ शासकीय रुग्णालयात उपचार केले जातात अशा आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची सुट देण्यात यावी. अशी सुचना पालकमंत्री मदन येरावार, मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या असून त्या करंजी (पांढरकवडा) प्राथमिक आरोग्य केंद्र, कोर्टा (उमरखेड), मेटीखेडा (कळंब), माथारजून (झरीजामणी), लोणी (आर्णि) आणि लोही (दारव्हा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आल्या आहेत. हृदयरोग असणा-या 0 ते 16 वयोगटातील रुग्ण, दोन्ही कान बधीर असलेले रुग्ण ज्यांना शस्त्रक्रियाद्वारे मोफत मशीन लावण्यात येईल असे रुग्ण आणि बोन मॅरो ट्रान्सप्लाँटची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. यासंबंधित आजार असणा-या जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा तपास करून पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपचारासाठी मोफत पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती ओमप्रकाश शेटे यांनी दिली.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बाबा येलके, डॉ.किशोर कोषटवार, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एम.ए. वारीस, विभागीय व्यवस्थापक डॉ. राहूल देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र इरपनवार, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश मारू आदी उपस्थित होते.