लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नगरपरिषदेत विषय समिती व सभापती निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडली. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व समित्या व सभापतींची निवड अविरोध झाली. भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात राष्ट्रवादीला दिलेला शब्द पूर्ण केला. राष्ट्रवादीच्या सदस्याला नियोजन सभापती पदी संधी दिली. निवड प्रक्रिया अविरोध होणार असल्याने औपचारिकताच बाकी होती.नगरपरिषदेतील संभाव्य सभापती कोण राहणार हे ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला. बांधकाम समिती सभापतीपदी माजी उपनगराध्यक्ष मनीष दुबे यांना संधी मिळाली तर आरोग्य समिती सभापतीपदी मनोज मुधोळकर यांचे नावे देण्यात आले. शिक्षण समिती सभापती कोमल कार्तिक ताजने, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी प्रियंका चेतन भवरे यांची नियुक्ती करण्यात आली. स्थायी समितीसाठी भाजपने प्रा. अमोल देशमुख, प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांची निवड केली तर काँग्रेसकडून स्थायी समितीवर पल्लवी रामटेके यांना पाठविण्यात आले.या निवड सभेला पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी होते. दुपारी १ वाजता सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला विषय समित्यांची निवड करण्यात आली.त्यानंतर त्या-त्या समितीच्या सभापती पदासाठी नामांकन दाखल करण्यात आले. मात्र प्रत्येक समिती सभापतीसाठी केवळ एकच नामांकन अर्ज आला. भाजपचे गटनेते विजय खडसे यांनी हे अर्ज दाखल केले. तर स्थायी समितीसाठी काँग्रेस गटनेते चंद्रशेखर चौधरी यांनी नाव दिले. सर्वच सभापतींची निवड अविरोध झाल्याची औपचारिक घोषणा पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहात केली.विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने भाजपचे उघडपणे काम केले होते. याच बदल्यात भाजपने राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज मुंदे यांना नियोजन सभापती पदाची संधी दिली. महत्वपूर्ण समित्यांवर त्याच त्या सदस्यांना संधी दिली जात असल्याने भाजपच्या गोटातील काही नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळाला. मात्र निवड प्रक्रियेतील सर्व नावे आमदार मदन येरावार यांनी निश्चित केल्यामुळे कुणीही उघड विरोध घेण्यास तयार नसल्याचेही सांगण्यात आले.
यवतमाळ नगरपरिषदेत पाचही सभापती अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST
नगरपरिषदेतील संभाव्य सभापती कोण राहणार हे ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला. बांधकाम समिती सभापतीपदी माजी उपनगराध्यक्ष मनीष दुबे यांना संधी मिळाली तर आरोग्य समिती सभापतीपदी मनोज मुधोळकर यांचे नावे देण्यात आले. शिक्षण समिती सभापती कोमल कार्तिक ताजने, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी प्रियंका चेतन भवरे यांची नियुक्ती करण्यात आली.
यवतमाळ नगरपरिषदेत पाचही सभापती अविरोध
ठळक मुद्देराष्ट्रवादीला दिलेला शब्द पाळला : बांधकाम, आरोग्य भाजपकडे